वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
आमदार सुभाष धोटेंनी हायवा मालकाला धरले धारेवर-नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळवून दिली मदत
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
राजुरा :- ग्रामपंचायत सोनापुर अंतर्गत येणाऱ्या सोनापूर फाट्या लगत पाटण मार्गे गडचांदुर कडे येणारी भरधाव हायवा वाहन क्र. MH34BG9977 समोरून येणाऱ्या पाळीव प्राणी बैलं - गाई आणि वासरू च्या कळपाला जोरदार धडक दिल्याने २ बैलं, ४ गाई, १ वासारूचा जागीच मृत्यू झाला तर ४ बैलं जखमी झाले. घटनास्थळी शेतकऱ्यांमार्फत रास्तारोको आंदोलन करण्यात आले. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आमदार सुभाष धोटे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिस निरीक्षक आणि पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तात्काळ पोलीस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
त्यानंतर आ. धोटे यांनी आपल्या व्यस्त कामातून वेळ
काढून घटनास्थळी दाखल होत हायवा चालक मालकाला धारेवर धरले. नुकसानग्रस्त आशिष मडावी १ बैल, राजीव गेडाम १ गाय, सागर कन्नाके २ गाय, १ वासरू, विलास जगरवार १ गोरा , धर्मा किन्नाके, नागू वेडमे, विशेषराव अत्राम, विठ्ठल अचालवार यांना हायवा मालकाकडून तातडीची नुकसान भरपाई मिळवून दिली. सर्व नुकसानग्रस्तांचे सांत्वन केले. तसेच या घटनेवर कार्यवाही करून शासनामार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय आर्थिक मदत लवकरात लवकर मिळवून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रसंगी सरपंच जगू येडमे, पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी, उप पोलिस निरीक्षक ओमप्रकाश गेडाम, सुधीर जाधव, पशुधन विकास अधिकारी नरसिंग तेलंग, संदिप राठोड, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी दीपक नागले, पशुधन परिवेक्षक धेंगडे, पोलिस पाटील संतोष सलाम, अनिल मडावी, नजू शेख यासह स्थानिक शेतकरी बांधव उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...