यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस येथील अमराई वार्डातील भुस्खलनग्रस्तांना वाढीव सहा महिन्याचे घरभाडे प्रत्येक कुटुंब 18000 रुपये वेकोलितर्फे देण्यात आले आहे. यापूर्वी भुस्खलनग्रस्तांना सहा महिन्यांचे घरभाडे मिळाले होते. जागेच्या पट्ट्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे या वाढीव घरभाड्यासंदर्भात पाठपुरावा केला होता.
त्याअनुषंगाने पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी अमराई वार्डातील भुस्खलनग्रस्तांना वाढीव सहा महिन्याचे घरभाडे देण्यासंदर्भात वेकोलीचे सीएमडी मनोजकुमार यांचेशी चर्चा करून त्यांना निर्देश दिले त्यानुसार या भुस्खलनग्रस्त कुटुंबाना पुढील सहा महिन्यांचे वाढीव घरभाडे प्रत्येक कुटुंब 18000 रुपये मिळाले आहे.
मागील मार्च महिन्यामध्ये चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी घुग्घुस येथील अमराई वार्डातील भूस्खलनग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात आढावा बैठक घेतली या बैठकीत भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे देखील उपस्थित होते.
घुग्घुस येथील अमराई वार्डातील भूस्खलनग्रस्तांना घरांसाठी देण्यात येणाऱ्या जागेच्या पट्टे वाटपाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने शासन स्तरावर पाठविला आहे. तोपर्यंत भूस्खलनग्रस्तांना ६ महिने देऊ केलेले घरभाडे आणि घरे बांधून देण्याच्या निर्णयासंदर्भात या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यात सकारात्मक चर्चा पार पडली होती.
या बैठकीला उपविभागीय अधिकारी मरूगनांथम एम., प्रशासन अधिकारी अजीत डोके, सुर्यवंशी मॅडम यांसह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
फेब्रुवारी महिन्यात नियोजन भवनात पार पडलेल्या आढावा बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी अमराई वार्डातील १६९ भूस्खलनग्रस्त बाधित कुटुंबीयांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात याव्या अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
२६ ऑगस्ट २०२२ रोजी घुग्घुस येथील अमराई वार्डात भूस्खलनाची दुर्दैवी घटना घडली होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने १६९ कुटुंबीयांना इतरत्र स्थलांतरीत करण्यात आले होते. या कुटुंबीयांना हक्काचा निवारा मिळण्यासाठी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. घुग्घुस येथील भूस्खलनग्रस्त कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचा आढावा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात घेण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, उपविभागीय अधिकारी मुरुगनांथम एम. व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे व भूस्खलनग्रस्त कुटुंबीय उपस्थित होते.
गत सहा महिन्यात पीडित कुटुंबीयांच्या राहण्याची व्यवस्था इतरत्र करण्यात आली असली तरी घरभाड्याकरीता देण्यात आलेली रक्कम संपली आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्याची रक्कम वेकोलिने त्वरीत द्यावी, १६९ कुटुंबीयांसाठी जिल्हा प्रशासनाने घरासाठी जागा निश्चित करून त्याठिकाणी पाणी, वीज, रस्ते आदींची सुविधा उपलब्ध करून देणे अशा आवश्यक सूचना पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला याआधीच वेळोवेळी दिल्या आहेत.
त्याअनुषंगाने वेकोलितर्फे भुस्खलनग्रस्तांना वाढीव सहा महिन्याचे घरभाडे म्हणून प्रत्येकी तीन हजार रुपये देण्यात आले आहे.
यापूर्वी घटना घडल्यानंतर आठ दिवसाच्या आत पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० हजार रुपयांची आर्थिक मदत, भाजपा घुग्घुसतर्फे ३ हजार रुपयांची मदत व जीवनावश्यक वस्तुंची किट देण्यात आली होती.
फेब्रुवारी महिन्यात २० तारखेला वेकोलि वसाहतीच्या शिवनगर परिसरातील पर्यायी जागेची पाहणी देखील भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, नायब तहसीलदार सचिन खंडाळे, नपचे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे व अमराई वार्डातील भूस्खलनग्रस्त कुटुंबीयांनी केली होती.
पुढील वाढीव सहा महिन्यांचे प्रत्येकी तीन हजार रुपये असे घरभाडे भुस्खलनग्रस्तांना मिळाल्याने त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचे आभार व्यक्त केले आहे.
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...