आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
देशातील सर्वात मोठा व्यवसाय हा शेती असून,शेतकरी सुख समाधानी असेल तेव्हाच देशाची आर्थिक परिस्थिती उंचावेल-मा.नितीन गोहणे, अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी सावली.
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
सावली:-भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्था व समाजव्यवस्थेतील एक मूलभूत घटक आहे. आपल्या मातृभूमीसाठी अन्नधान्य पिकवणारा, धरतीला सुजलाम सुफलाम बनवणारा शेतकरी रात्रंदिवस शेतात राबत असतो. थंडी, ऊन व पाऊस हे सगळं सहन करून शेतकरी आपल्यासाठी मेहनत करत असतो. शेतकऱ्याच्या मेहनतीमुळे आपल्याला अन्न मिळते.शेतकऱ्याचे राहणीमान अगदी साधे असते, परंतु त्याचे जीवन खडतर असते.तो रोज सकाळी लवकर उठून शेतावर जातो व पूर्ण दिवस शेतात काम करतो. त्याचे उत्पन्न बरेच वेळी पावसावर अवलंबून असते. कमी पाऊस किंवा अतिवृष्टी या पैकी काहीही झाले तर त्याला नुकसान सोसावे लागते.अनेकवेळा त्याला कर्जबाजारी व्हावे लागते.अश्यातच मुंडाळा येथील शेतकऱ्यांचा मदतीस राज्याचे माजी मंत्री, लोकनेते,विद्यमान आमदार मा.विजयभाऊ वडेट्टीवार हे पुढे सरसावले आहेत.
*सविस्तर वृत्त असे की, सावली तालुक्यातील मौजा मुंडला येथील मामा तलाव हे लिक झाले होते, या तलावा-खाली जवळ पास २०० एकर शेती ओलिता खाली येते.सदर मामा तलवा लीक असल्यामुळे शेतकऱ्यांचे या वर्षी पिकाचे नुकसान झाले असते, मोठी आर्थिक हानी झाली असती व शेतकऱ्यांना नाहक त्रास झाला असता. कित्येक शेतकऱ्यांचे हातचे पीक गेले असते, ही घटना घडली असती तर गोर गरीब शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असती हे नाकारता येत नाही.मौजा मुडांळा येथील मामा तलाव लीक असल्याचि माहिती माजी सरपंच दामोदर गोबाळे व गणपत शेंडे यांनी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीनजी गोहणे यांनी दिली होती.
घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन नितीन गोहणे यांनी तात्काळ राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांना सदर मुंडाळा येथील मामा तलाव लीक असल्याबाबत माहिती दिली, शेतकरी बांधवाचे कसल्याही प्रकारे नुस्कान नं होऊ देता, व यावर्षी हातचे पिक जाऊ नये, या लोकाभावनेतून ,शेतकऱ्यांचे नेते व आमदार मा.विजयभाऊ वडेट्टीवर यांनी आमदार स्थानिक विकास योजने अंतर्गत मामा तलवाच्या दुरुस्तीसाठी १०लक्ष रुपये मंजूर केले व तात्काळ अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे व लवकरात लवकर मामा तलाव दुरुस्तीकरणाचे आदेश दिले.सावली तालुका काँग्रेस पार्टीच्या सतत पाठ-पुरवठ्यामुळे आज मोठी आर्थिक हानी व शेतकऱ्यांचे नुस्कान टळले, आज सावली तालुका काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष नितीनजी गोहणे मामा तलाव, मुंडळा येथे भेट दिली असता स्थानिक शेतकऱ्यांनी लोकनेते,विद्यमान आमदार मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे व सावली तालुका काँग्रेस कमिटीचे आभार व्यक्त केले.शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले, यावेळी बोथलीचे उपसरपंच व जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते नरेश पाटील गड्डमवार,गणपतजी शेंडे, दुमाजी गंडाते,नीलकंठ भोयर,चोकेश्वर ठीकरे,अजय जेंगटे तसेच स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...
*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*सावली शहर वासियांचा विजयी निर्धार* *प्रचारसभेत व्हीजेएनटी काँग्रेस प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवीताई रेनके तथा युवक...