Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *सलाईन द्वारे झाडांना...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*सलाईन द्वारे झाडांना पाणी व पक्षांकरिता जलपात्राची सुविध* *प्रमोद पानघाटे यांचा वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम*

*सलाईन द्वारे झाडांना पाणी व पक्षांकरिता जलपात्राची सुविध*    *प्रमोद पानघाटे यांचा वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम*

*सलाईन द्वारे झाडांना पाणी व पक्षांकरिता जलपात्राची सुविध*

प्रमोद पानघाटे यांचा वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम

✍️ श्रीकृष्ण गोरे

राजुरा

राजुरा : -वाढदिवस म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील अविस्मरणीय दिवस, सध्याच्या युगात वाढदिव साजरा करण्याची जणूकाही स्पर्धाच सुरू झाली आहे. श्रीमंतापासून तर गरिबांपर्यंत सर्वच लोक वाढदिवसानिमित्त नको तो खर्च करीत असतो. काही डिजे लावून तर काही आलिशान हॉटेलमध्ये मित्रमंडळीसह पार्टी करणे, तर काही लोक वाढदिवसाला मोठ्या कार्यक्रमाचे स्वरूप देऊन मोठ्या थाटामाटात आयोजन करीत असते, मात्र रामपूर येथील पानठेला चालक प्रमोद पानघाटे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त इतर खर्च न करता अनोखी शक्कल लढवित दवाखान्यातून सलाईनच्या रिकाम्या बॉटल जमा करून त्यात पाणी घालून लहान झाडांना संजीवनी देण्याचा व मोठ्या झाडांवर जलपात्र लावून पशू पक्षांना पाणी पुरविण्याची अनोखी शक्कल लढविली आहे.

राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वेकोलिच्या कोळसा खाणींचे जाळे पसरले आहे. कोळसा खाणीमुळे जमिनीमधील पाण्याची पातळी खालावली असून वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली आहे. याचा परिणाम मानव जिवांप्रमानेच पशुपक्षी व झाडांवर दिसून येत आहे. यावर छोटासा उपाय म्हणून प्रमोद पानघाटे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त रामपूर येथील येरणे ले-आऊट मधील लहान झाडांकरिता डॉ. रितेश ठाकरे यांच्या दवाखान्यातून रिकाम्या सलाईन बॉटल आणून त्यामध्ये पाणी भरून त्याद्वारे झाडांना पाणी देण्याचा व घराजवळील मोठ्या झाडांवर पशू पक्षांकरीता जलपात्र लावित इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

जमिनीतील खालावलेली पाण्याची पातळी व वातावरणातील उष्णता यामुळे लहान झाडे पाण्याअभावी सुकून जात आहे. अशावेळी झाडाजवळ ओलावा टिकून रहावा म्हणून ठिंबक सिंचनाप्रमाने थेंब थेंब पाणी झाडाजवळ पोहचविण्यासाठी दवाखान्यात सलाईन लावल्यानंतर रिकाम्या झालेल्या सलाईनच्या बॉटल जमा करून त्यात पाणी घालून झाडांना संजीवनी देण्याचे काम सुरू केले आहे. तर सिमेंटच्या जंगलात पशू पक्षांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत असून काही पशूपक्षी पाण्याअभावी मृत पावत आहे. त्यांना वाचविण्यासाठी पाण्याची सोय म्हणून झाडांवर घराच्या खिडकीजवळ पाणी भरलेले जलपात्र लावून वाढदिवस साजरा केला आहे. यामुळे अनेकांनी प्रमोद पानघाटे यांचे कौतुक केले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...