रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
अन्यथा जनआंदोलनाचा आशिष देरकर यांचा इशारा
*अल्ट्राटेक कंपनीत सरपंचांची कवडीमोल इज्जत*
*कंपनीला धडा शिकविण्याची गरज*
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:- तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारपूर येथे मोठ्या प्रमाणात लोडर भरती सुरू आहे. नियमबाह्य भरती करण्यात येत असून भरतीत आर्थिक गैरव्यवहार सुद्धा झाले आहे. आतापर्यंत जवळपास ९० उमेदवारांची भरती करण्यात आली असून दत्तक गावातील सरपंचांच्या शिफारशीने उर्वरित लोडर भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी स्मार्ट ग्राम बिबीचे उपसरपंच आशिष देरकर यांनी अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर प्रशासनाकडे केली आहे.
सरपंच गावाचा प्रमुख असतो. कंपनीला सीएसआर अंतर्गत कोणतीही योजना राबवायची असल्यास सरपंचावर जबाबदारी सोपविण्यात येते. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात लोडर भरती होत असून सरपंचांच्या शिफारशीला कवडीमोल महत्व देण्यात आले आहे. दत्तक गावातील कोणत्याही सरपंचांच्या शिफारशीला प्राधान्य देण्यात येत नसल्याने त्या-त्या गावामध्ये सरपंचांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत आहे.
सरपंच हा स्थानिक लोकप्रतिनिधी असून कंपनीला त्यांच्या विविध योजना राबविण्यासाठी सरपंचांची मदत घेणे आवश्यक असते. कंपनीकडून राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजना सरपंचांना लोकसहभागातून पार पाडाव्या लागतात. यासाठी कंपनी व गावकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून सरपंच काम करीत असतो. दत्तक गावातील सर्वच सरपंच कंपनीला वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहकार्य करीत असतात. मात्र आजघडीला इतक्या मोठ्या लोडर भरतीमध्ये स्वतःच्या शिफारसीने सरपंच गावातील एकाही गरीब उमेदवाराला प्राधान्याने न्याय मिळवून देऊ शकत नसल्याने सरपंचांच्या प्रतिष्ठेला फार मोठा धक्का बसला आहे.
सर्वच सरपंचांच्या मनात ही बाब खदखदत आहे. दत्तक गावातील सरपंच वेगवेगळ्या राजकीय पक्षात काम करतात. त्यामुळे कंपनी विरोधात एकत्रित येत नसल्याचे दिसते. याचाच गैरफायदा कंपनी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. मात्र दत्तक गावातील विविध पक्षाच्या सरपंचांनी पक्षीय मतभेद विसरून एकत्र येऊन कंपनी विरोधात जन आंदोलन उभारण्याची गरज असल्याचे आशिष देरकर यांनी म्हटले आहे.
केवळ युनियन पदाधिकारी यांच्याच शिफारसीने भरती करण्यात येत आहे. केवळ ६ महिन्यांपासून काम करीत असलेल्या उमेदवारांना सामावून घेतले मात्र दोन वर्षांपासून काम करीत असलेल्या उमेदवारांना पात्रता असतानाही डावलण्यात आले. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या उमेदवारांना डावलून ऑफिसर लोकांशी मधुर संबंध असणाऱ्या उमेदवारांची निवड करण्यात आली. सोयीनुसार भरती सुरु असल्याचे दिसून येत असून एकाच कुटुंबातील जावई-सोयरे, साळभाऊ चालतात. मात्र विवाहानंतर वेगवेगळे कुटुंब असलेले सख्खे भाऊ का चालत नाही? हा सुद्धा गहन प्रश्न आहे. सर्वच सरपंचांच्या मनात ही बाब खदखदत आहे. दत्तक गावातील सरपंच वेगवेगळ्या राजकीय पक्षात काम करतात. त्यामुळे कंपनी विरोधात एकत्रित येत नसल्याचे दिसते. याचाच गैरफायदा आपल्या कंपनी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. पुढील भरतीमध्ये सरपंचांना विश्वासात घेऊन भरती करावी अन्यथा आम्ही सर्व सरपंच व गावकरी मिळून कंपनी विरोधात जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा स्मार्ट ग्राम बिबी येथील उपसरपंच आशिष देरकर यांनी कंपनीला दिला आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...