Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *वंचितच्या कामबंद आंदोलनाचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*वंचितच्या कामबंद आंदोलनाचा हर्षा कंपनीने घेतला धसका* *स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात वंचितला यश*

*वंचितच्या कामबंद आंदोलनाचा हर्षा कंपनीने घेतला धसका*    *स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात वंचितला यश*

*वंचितच्या कामबंद आंदोलनाचा हर्षा कंपनीने घेतला धसका*

 

स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात वंचितला यश

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:- राजुरा तालु्क्यातील साखरी गावात सुरू असलेल्या WCL वेकोली च्या खुली खदानी मार्फत हर्षा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्या या मागणीसाठी आज दिनांक 24 मे 2023 रोजी वंचीत चे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या नेतृत्वात कामबंद आंदोलन पुकारण्यात आले.

हर्षा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे बहुतांश कामे पेसा अंतर्गत असलेल्या साखरी ग्रामपंचायत भागात चालतात त्यामुळे कंपनीच्या कामामुळे प्रदूषण, खराब रस्त्यांमुळे अपघात आणि वेकोलीच्या खदाणीमुळे येथील घरांना हादरे बसत आहेत, गावातील पाण्याच्या बोरिंगला तडा जात आहे यामुळे कंपनीच्या सर्व भार साखरी गाववासी सहन करत असतांना येथील बेरोजगार युवकांना हर्षा कंपनीने प्राधान्य न देता बाहेरील युवकांना रोजगार देत असल्याने वंचीत बहूजन आघाडीने याच्या निषेध करत 17 मे 2023 रोजी निवेदनाद्वारे स्थानिकांना प्राधान्य द्या अशी मागणी केली होती परंतू कंपनी ने दुर्लक्ष केले. त्यामुळे आज वंचित च्या वतीने कामबंद आंदोलन पुकारण्यात आले यात गावातील असंख्य बेरोजगार युवक, महिला व वृद्धांनी सहभाग घेतला.

खदाणीतून चालणारे असंख्य वाहने रस्त्यावर थांबवून चक्का जाम करण्यात आला. ‘स्थानिकांना रोजगार द्या’, ‘रोजगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा’ अश्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

कंपनी च्या व्यवस्थापकांनी शिष्टमंडळासोबत चर्चा केली परंतु अवघ्या काही स्थानिक लोकांना घेऊ असे आश्वासन दिल्यानंतर पुन्हा आंदोलन सुरू ठेवण्यात आले त्यानंतर कंपनीने धसका घेऊन आपली भूमिका बद्दलवत आंदोलकांच्या मागणीला होकार दिला व मागणीप्रमाणे रोजगारात क्षमतेप्रमाणे रोजगार देण्याचे लेखी हमीपत्र दिले, यामुळे वंचित बहूजन आघाडीच्या आंदोलनाने आता स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारात

" स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य मिळणार.

या निर्णयामुळे साखरी परिसरातील बेरोजगार युवकांनी एकच जल्लोष करीत वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांचे आभार मानले

आंदोलनात वंचित बहूजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कविता गौरकार, राजूरा तालूका अध्यक्ष सुशिल मडावी, राजूरा तालूका उपाध्यक्ष धनंजय बोर्डे, कोरपना तालूका संघटक अमोल निरंजने, युवा आघाडीचे शुभम मंडपे, सम्यक विद्यार्थी आंदोलन चे जिल्हाध्यक्ष धिरज तेलंग, जेष्ट नेते रामदास चौधरी, जिल्हा महासचिव अल्का मोटघरे, जिल्हा संघटक अविताताई उके, जिल्हा कोषाध्यक्ष पुष्पलता कोटांगले, कार्यकर्त्या नम्रता साव, वैशाली दुबे तसेच साखरी गावातील असंख्य बेरोजगार युवक, महिला, वृद्ध अश्या शेकडो जणांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...