Home / चंद्रपूर - जिल्हा / *आरोग्य शिबिराच्या...

चंद्रपूर - जिल्हा

*आरोग्य शिबिराच्या प्रचार प्रसारासाठी स्थानिक यंत्रणा कार्यान्वित करा - आ. किशोर जोरगेवार* *मनपा आयुक्तांना सुचना भव्य आरोग्य शिबिर, संयुक्त नियोजन बैठक संपन्न*

*आरोग्य शिबिराच्या प्रचार प्रसारासाठी स्थानिक यंत्रणा कार्यान्वित करा - आ. किशोर जोरगेवार*    *मनपा आयुक्तांना सुचना भव्य आरोग्य शिबिर, संयुक्त नियोजन बैठक संपन्न*

*आरोग्य शिबिराच्या प्रचार प्रसारासाठी स्थानिक यंत्रणा कार्यान्वित करा-आ. किशोर जोरगेवार*

 

मनपा आयुक्तांना सुचना भव्य आरोग्य शिबिर, संयुक्त नियोजन बैठक संपन्न

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 

चंद्रपूर:-नागरिकांचे आणि त्यातही विशेष: महिलांचे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहेत. पारिवारीक जबाबदारीच्या व्यस्ततेत रुग्णालयात उपचाराकरिता जाणे टाळणा-यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आता आपण रुग्णसेवाच नागरिकांच्या दारी नेण्याचा संकल्प केला असुन आरोग्य आपल्या दारी हा उपक्रम राबवत शहरातील विविध भागात ११भव्य आरोग्य शिबिर आयोजित करत आहोत. या शिबिराचा प्रचार प्रसार करण्यासाठी मनपा प्रशासनाने आपली स्थानिक यंत्रणा कार्यान्वित करावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्तांना केल्या असुन यात यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्तेही त्यांना सहकार्य करतील असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातुन चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे शहरातील १२आरोग्य वर्धनी केंद्रात १जुन पासुन आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. या संदर्भात आरोग्य विभागाच्या विविध संघटना, शासकिय यंत्रणा यांच्या संयुक्त बैठकीचे एन.डी हॉटेल येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर सुचना केल्या आहे. या बैठकीला मनपा आयुक्त विपिन पालीवाल, शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटिल, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, मनपा उपायुक्त अशोक गराडे, मनपा वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, आयएमए संघटनेच्या अध्यक्षा डॉ. कीर्ती साने, सावंगी मेघे रुग्णालयाचे शिबीर संयोजक नाना शिंगणे, डॉ. अशोक वासलवार, रोटरी क्

या बैठकीत बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, लोकप्रतिनिधी म्हणुन आम्हाला करोडो रुपयांचा निधी मिळतो. मात्र यातील अधिकांश निधी हा रोड, नाली, इमारती बांधकाम आदी विकासकामांवर खर्च होतो. शिक्षण आणि आरोग्य यावर फार कमी निधी खर्च केला जातो. त्यामुळे आता हि परिस्थिती बदलायची आहे. आपण शहरात विविध ठिकाणी आरोग्य शिबीरे आयोजित करण्यासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी दिला आहे. आणखी निधी लागेल तर ते ही देण्याची आमची तयारी आहे. हे शिबिर भव्य झाली पाहिजे. लहान बालके आणि महिलांना होणा-या आजाराच्या सर्व चाचण्या या शिबिरामध्ये करण्यात याव्यात. केवळ तपासणीच नाही तर येथे येणा-या रुग्णावर निशुल्क औषधोपचार करण्यात यावा. शिबिरात येणा-या नागरिकांची गैरसोय होणार नाही असे सूक्ष्म नियोजन येथे करा अशा सुचना यावेळी आ. जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला दिल्या आहेत.

यावेळी मनपा आयुक्त यांनी सदर शिबिरात करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती सादर केली. प्रत्येक आरोग्य शिबिरात विविध आजार तपासणीचे १२ विभाग केल्या जाणार आहे. यात महिलांच्या तपासणी करिता दोन वेगळे विशेष विभाग केल्या जाणार आहे. रुग्णांच्या अल्पोहाराची व्यवस्था शिबिरात केली जाणार आहे. एका केंद्रावर २ दिवस चालणा-या या शिबिरासाठी ५ दिवस रुग्णांची नोदणी करुन त्यांना फाईल दिल्या जाणार आहे. तसेच आभा कार्डही सदर शिबिरामध्ये उपलब्ध करुन दिल्या जातील असे मनपा आयुक्त विपिल पालिवाल यांनी सांगीतले आहे. सदर शिबिराला आयएमए संघटनेचे डॉक्टर, मनपा आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, युवा नेते अमोल शेंडे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, प्रा. श्याम हेडाऊ, शहर संघटक विश्वजीत शाहा, बंगाली समाज महिला शहर

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...