Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *मुख्य रस्त्याचे काम...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*मुख्य रस्त्याचे काम कासवगतीने सुरु* *खोदलेले रस्ते पावसापूर्वी पूर्ववत करा -नरसिंग हामने उपसरपंच यांची मागणी*

*मुख्य  रस्त्याचे काम कासवगतीने सुरु*    *खोदलेले रस्ते पावसापूर्वी पूर्ववत करा -नरसिंग हामने उपसरपंच यांची मागणी*

*मुख्य  रस्त्याचे काम कासवगतीने सुरु*

 

खोदलेले रस्ते पावसापूर्वी पूर्ववत करा -नरसिंग हामने उपसरपंच यांची मागणी

 

✍️ सय्यद शब्बीर जागीरदार जीवती

 

जिवती :-  तालुक्यात  शासनातर्फे मंजूर विविध रस्तेविकास प्रकल्पातून कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर असली, तरी गडचांदुर ते पाटण-शेणगाव- जिवती ते तेलंगणा सीमेपर्यंतच्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण व काँक्रिटीकरणं करण्याचे काम कंत्राटदाराकडून ऐन पावसाच्या तोंडावर या रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस अतिशय दयनीय झाला आहे. हा रस्ता सध्या तरी पावसापूर्वी पूर्ववत होईल असे चित्र दिसत नाही, परंतु प्रत्यक्षात आता पावसाळा तोंडावर आला असताना रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण व्हावे म्हणून कंत्राटदरकडून अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून काम केले जात आहे. या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे, खड्ड्यांमुळे, कुणाला इजा झाल्यावर, अपंगत्व आल्यावर अथवा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार असेल तर मग कोट्यवधी रुपये मंजूर होऊन उपयोग काय, असा साहजिक प्रश्‍न सर्वसामान्य तालुका वासीयांना पडला आहे.

नाईकनगर,पाटण,आंबेझरी ,शेणगाव,तालुक्याचे ठिकाण येथे सुरू असलेल्या मुख्य  रस्त्याचे व त्या लगत नाल्यांची कामे होत आहेत,गिट्टी आतरुन आहे त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे  चुकविताना वाहन चालकांची कसरत सुरू आहे. तर हा  अपघाताला निमंत्रण देणारा रस्ता झाल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून व त्रास सहन करीत प्रवास करावा लागत आहे. आता पावसाळा तोंडावर येऊन ठेपल्याने या रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार ? असा प्रश्न  नागरिकांतून व लोकप्रतिनीधीतून होत आहे.

परिणामी आजूबाजूच्या बहुतांश गावातील नागरिकांना तालुक्याच्या किंवा गडचांदुरच्या ठिकाणी येण्यासाठी महत्वाचा हा रस्ता आहे. सध्या या रस्त्याची दयनीय अवस्था झालेल्या या रस्त्यावरून खड्डे चुकविताना वाहन चालकांना कसरत करावी लागत असून वाहन चालक त्रस्त झाले आहेत. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघाताला निमंत्रण मिळत असून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तर दुचाकी, तीन व चार चाकी वाहने या खड्ड्यात आदळत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नियमितपणे प्रवास करणाऱ्या नागरिकांना मणक्याचे आजार जडू लागले

आहेत. मात्र मे महिना ही आता अर्धा संपत आला असून जून महिन्यात पावसाळा सुरू होत आहे. तरी रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांनी व लोकप्रतिनीधीने उपस्थित केला  आहे.

वाहनचालकांना काम पूर्ण होण्याची वाट पाहवी लागणार आहे

या रस्त्यावरून सीमावर्ती व आजूबाजूच्या गावातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी ये - जा करावी लागते. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रहदारी आहे. मात्र रस्त्याचे काम काही वर्षांपासून सुरू आहे परिणामी, रस्त्यावर खड्डे पडलेले व कंत्राटदरकडून काम सुरू असल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. तर प्रत्येक वर्षी संबधित बांधकाम विभागाकडून काम तत्काळ पूर्ण होईल असे सांगण्यात येते, मात्र पावसाळा तोंडावर आल्यामुळे काम तात्काळ होईल असे वाटत नाही. त्यामुळे पुन्हा नागरिकांना आणि वाहन चालकांना प्रतीक्षाच  करावी लागणार आहे.

नरसिंग हामने उपसरपंच ग्रामपंचायत शेणगाव

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...