आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
जिवती पंचायत समितीची वार्षिक आमसभा संपन्न
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर/जिवती :- जिवती पंचायत समितीची वर्षे २०२२ -२०२३ ची वार्षिक आमसभा आश्रम शाळा जिवती येथे सकाळी ११:३० वाजता लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. संत गाडगे बाबा आणि संत तुकोडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करून आमसभेला सुरूवात करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी स्वागत गीतांनी मान्यवरांचे स्वागत केले. गटविकास अधिकारी डॉ. भागवत रेजीवाड यांना सर्वकृष्ट गटविकास अधिकारी म्हणून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.
या प्रसंगी प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी एस. मुरुगुनाथाम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलवडे, तहसीलदार दिपक वजाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गाहलोत, अती. गट विकास अधिकारी गजानन मुंडकर, तालुकाध्यक्ष गणपत आडे, माजी सभापती सुग्रीव गोतावेळ, नगरसेवक श्यामराव गेडाम, यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित विभागाची सविस्तर माहिती घेऊन त्यावर ग्रामपंचायतीमधील हरकती जानून घेतल्या, जिवती तालुक्यातील सध्या नेटवर्क ची अडचण लक्षात घेता BSNL चे 4G नेटवर्क चे टॉवर उभारणे, जल जीवन मिशन योजनेअंतर्गत १२ महिने पाणी साठा असणाऱ्या ठिकाणी स्त्रोतांचे निर्मिती करणे, तालुक्यातील प्रत्येक विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे, आदिवासी बहुल दुर्गम भागातील गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले पाहिजे, मुख्यालयी राहून, प्रत्यक्षात नागरिकांना काय अडचणी येतात ते जाणून त्यावर माणुसकीच्या दृष्टीने विचार करून या दुर्गम भागातील गोरगरीब जनतेच्या समस्या तातडीने सोडवा अशा सूचना संबंधीत विभाग प्रमुखांना दिल्या. आवश्यक तेथे आपण शासन दरबारी सर्वतोपरी पाठपुरावा करून येथील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सुद्धा आमदार धोटे यांनी दिली. या प्रसंगी अनेक विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी डॉ. भागवत रेजीवाड यांनी केले. संचालन शिक्षण विस्तार अधिकारी भिमा काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहायक शिक्षक संग्राम शिंदे यांनी केले.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...