Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *अधिकारी, कर्मचाऱ्यांनी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनसेवेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे -आमदार सुभाष धोटे* *कोरपना पंचायत समितीची वार्षिक आमसभा संपन्न*

*अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनसेवेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे -आमदार सुभाष धोटे*    *कोरपना पंचायत समितीची वार्षिक आमसभा संपन्न*

*अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनसेवेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे -आमदार सुभाष धोटे*

 

कोरपना पंचायत समितीची वार्षिक आमसभा संपन्न

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना :- कोरपना पंचायत समितीची वर्षे २०२२ - २०२३ ची वार्षिक आमसभा स्व वेणुताई संबाशिव झाडे सभागृह स्काॅलर सर्च अकॅडमी, कोरपना येथे सकाळी ११ वाजता लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. संत गाडगे बाबा आणि संत तुकोडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करून आमसभेला सुरूवात करण्यात आली.

       या प्रसंगी मुख्य लेखा कार्यकारी अधिकारी अशोक मातकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संग्राम शिंदे, तहसीलदार विनोद डोनगावकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक दिपेंद्रे लोखंडे, जेष्ठ काँग्रेस नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, माजी सभापती श्यामभाऊ रणदिवे, माजी उपसभापती संभाजी कोवे, जेष्ठ नेते सुरेश मालेकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित विभागाची सविस्तर माहिती घेऊन त्यावर विविध ग्रामपंचायतीमधील वस्तूस्थिती, समस्या जाणून घेतल्या, आरोग्य विभाग व पशुवैद्यकीय विभागतील समस्या जाणून घेतल्या, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम करावे, शासकीय योजनांच्या लाभापासून कुणीही वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून जनसेवेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे अशा सूचना संबंधीत विभाग प्रमुखांना दिल्या.

      या प्रसंगी तालुका विद्युत विभाग, कृषी, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, शालेय पोषण, पशुसंवर्धन, पंचायत, समाज कल्याण, उमेद अभियान, स्वच्छ भारत अभियान, घरकुल, मनरेगा, परिवहन, जि. प उपविभाग, एकात्मिक बाल विकास, मृद व जलसंधारण, भुमी अभिलेख, राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण, ग्रामीण जिवन्नोती अभियान इत्यादी अनेक विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी विजय पेंदोर यांनी केले. संचालन शिक्षण विस्तार अधिकारी सचिन मालवी यांनी केले तर आभार प्रदर्शन गटशिक्षणाधिकारी रूपेश कांबळे यांनी केले.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...