यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
Reg No. MH-36-0010493
वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम
घुग्घुस शहराच्या प्रत्येक वार्डात व चौका चौकात गुरुवार, ११ मे रोजी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचा वाढदिवस भाजपा कार्यकर्त्यांनी उत्साहात साजरा केला.
भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी त्यांच्या घरी सकाळ पासूनच गर्दी केली होती.
ऑटो-मिनिडोर चालक मालकांतर्फे बसस्थानक चौकात, मेडिकल असोसिएशनतर्फे राजीव रतन चौकात, मुन्नूरूकाप्पू समाज बांधवांतर्फे समाज भावनात, मॉर्निंग वॉक ग्रुपतर्फे, सुभाष नगर येथे हनुमान मंदिरात, शास्त्रीनगर, शिवनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, गांधी चौक, अमराई वार्ड, तिलकनगर येथे भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला तसेच
कोटेक्ना कंपनीच्या कामगारांतर्फे इंदिरानगर येथे भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचा वाढदिवस केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कामगारांनी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
इंदिरानगर येथे भाजपा महिला आघाडीतर्फे भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. याप्रसंगी महिलांनी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची ओवाळणी केली तसेच शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधव व जेष्ठ नागरिकांना भेटवस्तू देण्यात आली व वांढरी येथे अनाथ आश्रमात अनाथ मुलांना भेट वस्तू देऊन व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
प्रयास सभागृहात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, प्रमुख पाहुणे म्हणून भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जि.प.सभापती ब्रिजभूषण पाझारे, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, माजी पं. स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, भाजपाचे विनोद चौधरी, चिन्नाजी नलभोगा, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रेमलाल पारधी, जेष्ठ नागरिक संघाचे मधुकर मालेकर, सिनू इसारप, साजन गोहने, धानोरा सरपंच विजय आगरे, विनोद खेवले, ऋषी कोवे, पोंभुर्णा भाजपा शहराध्यक्ष ऋषी कोटरंगे, पोंभुर्णा माजी पं. स. उपसभापती विनोद देशमुख, पोंभुर्णा भाजपा प्रसिद्धी प्रमुख दिलीप मेकलवार, चिंतलधाबा उपसरपंच रोशन ठेंगणे, माजी उपसरपंच अरुण कुत्तरमारे, रज्जाक शेख, बबनराव बोढे, लीलाताई बोढे मंचावर उपस्थित होते.
मनोगत व्यक्त करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, भाजपाचा विचार घराघरात पोहचविण्यात विवेक बोढे यांचे महत्वाचे योगदान आहे. त्यांनी भाजपाच्या माध्यमातून समाज सेवेचे व्रत निरंतर उराशी बाळगले. घुग्घुसच्या विकासासोबत गोर गरिबांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून मागील चार वर्षात घुग्घुस परिसरातील २५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनेचा लाभ दिला. अनेक सामाजिक उपक्रम राबविले ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून शेकडो रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रुग्णांच्या विविध आजरांवर मोठया शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात आली. चार टँकर द्वारे शहर वासियांसाठी नि:शुल्क जलसेवा सुरु आहे. नविन बसस्थानक, ग्रामीण रुग्णालय, रस्ते, पाण्याची टाकी, आरो मशीन, नाली, बगीचे, हायमास्ट लाईट अशी विविध विकास कामे भाजपाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. 'रुग्णसेवक' म्हणून रुग्णसेवेचे व समाज सेवेचे व्रत उराशी बाळगणाऱ्या विवेक बोढे यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.
याप्रसंगी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला व केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी लाभार्थ्यांना धुरमुक्त चूल वाटप, दिव्यांग बांधवांना कुलजार वाटप, महिला भाजीपाला विक्रेत्यांना छत्री वाटप, कॅटर्स कामगार महिलांना साडी वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच भोजनदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...