Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *कुत्राच तो भुंकला म्हणून...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*कुत्राच तो भुंकला म्हणून काय झाले?*

*कुत्राच तो भुंकला म्हणून काय झाले?*

*कुत्राच तो भुंकला म्हणून काय झाले?*

 

*अरे भाऊ !*

*हे तू कसे विसरलास*

*आणि विचलत झालास ?*

*परावलंबी, बांडगूळ कुत्राच तो*

*भुंकला म्हणून काय झाले?*

*मालकाप्रती ईमानदार व चौकस ?*

*हे दाखवून देण्याची घाई झाल्याने*

*आगंतुकावर धावून जाणे*

*भुंकण्याची आतिशबाजी, चापलुशी करणे*

*कुत्र्याचा गुणधर्म आहे |*

*ईमानदारी, स्वामिनिष्ठता ?*

*दाखविण्याचे हे एक मर्म आहे ||*

 

*कुत्रा भुंकला की मालकही खुष*

*आपल्या खाल्ल्या अन्नाला,*

*दवा दारूला जागला म्हणून |*

*आणि समोरच्याला पोकळ ताकिद*

*कुत्राच का असेना*

*संरक्षाची फौज असल्याचे*

*दाखवून दिले म्हणून ||*

 

*भुंकताना लाडिकपणे दटावताच*

*कुई कुई करत शेपटी हलवणे हे*

*गर्वाने कुत्रा नियंत्रणात*

*असल्याचे मालकही खात्री करतो |*

*सांगकाम्या असतात म्हणून*

*मुखंड होयबा कुत्र्यांवर फुका गर्व करतों ||*

 

*मित्रा ! भुंकणारा कुत्रा चावत नाही |*

*साधे वाकल्यासारखे केले तरी*

*गांडीला पाय लावून*

*घाबरून पळून जाण्याची करते घाई ||*

 

*कुत्र्याला मालकच नाही*

*कोणीही हाडकाची लालुच दाखवताच*

*भुंकण्याची आतिषबाजी विसरून*

*लाळघाट्या, लालची कुत्रा*

*कुणा समोरही होतो लट्टू  |*

*आखीर तो भाड्याचाच तट्टू  ||*

 

*बळकावलेल्या आयत्या*

*सत्ता संपत्तीमुळे कलंकित*

*झालेला ढोंगी मुखंड सतत दहशतीखाली*

*संरक्षणासाठी सतत कुत्र्याच्या गराड्यात*

*बेगडी रुबाबात असतो |*

*येणाऱ्या हरेक निष्ठावान सैनिकांत सुद्धा त्याला*

*त्याचे आसन डळमळीत करणारे*

*हपापाचा माल गपापाच दिसतो ||*

 

*भाकरी पुरती चाकरी करणाऱ्यांना*

*काय माहित एक एक निष्ठावान स्वाभिमानी*

*छप्पनला भारी पडते म्हणून? |*

*धडा वेगळे शिर झाले तरी यांच्यातील*

*स्वाभिमानी जयभीमचा हुंकारच*

*येणाऱ्या पिढीला चेतवित असते म्हणून ||*

 

*लक्षात ठेव भावा !*

*तु तर जिंकण्याच्या तयारीनेच*

*युद्धात उतरला आहे |*

*तुला लक्ष्य नाही रणनीती बदलायची आहे ||*

 

*तुझ्यावर भुंकून येणारे कुत्रे*

*आणि त्यांचे ऐतखाऊ पाठीराखे*

*मुखंडही दुर्लक्षित केले तरी चालेल*

*ते तुझे लक्ष्य नाही |*

*माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेल्या*

*प्रमाणित विनयपीठ*

*आणि बापाची सांघिक संघटनशक्ती*

*"सबुरि"पेक्षा कोणी श्रेष्ठ नाही ||*

 

(सबुरि = स- समता सैनिक दल, दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया)

 

- अशोककुमार उमरे, 8698842402

"निळाई" सिद्धार्थ विहार, गडचांदूर त कोरपना जि चंद्रपूर

ता. १००५२०२३

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...