Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / *ही प्रतिमा नव्या पिढीला...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

*ही प्रतिमा नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल : आमदार सुभाष धोटे* *त्या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे अनावरण*

*ही प्रतिमा नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल : आमदार सुभाष धोटे*    *त्या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे अनावरण*

*ही प्रतिमा नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल : आमदार सुभाष धोटे*

 

*त्या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे अनावरण*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

जिवती  :--  महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावरील त्या १४ गावा पैकी एक मौजा परमडोली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान तत्कालीन संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना समर्पित करतांना चे अनमोल दृश्य चितारलेल्या प्रतिमेचे अनावरण लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.

      या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार धोटे यांनी सांगितले की महुसदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून भारताला एकतेच्या मजबूत सूत्रात बांधणारे संविधन तयार केले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ही राज्यघटना स्वीकृत करण्यात आली व २६ जानेवारी १९५० पासून अमलात आली. भारतीय संविधान हा प्रत्येक भारतीयांसाठी गौरव ग्रंथ आहे. ज्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे हक्क, अधिकार मिळाले असून सर्वांना सन्मानाने जगता येत आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रसंगाचे तितकेच सुरेख चित्रण असलेली ही प्रतिमा नव्या पिढीला निश्चिततच प्रेरणादायी ठरेल याची खात्री आहे.

     या प्रसंगी उपसभापती केरामेरी सय्यद अब्दुल कलाम, प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) आदिलाबाद अजमेश श्याम नायक, सरपंच निलाबाई विराडे, सरपंच बालाजी सुलगे, तालुकाध्यक्ष गणपत आडे, माजी सभापती  सुग्रीव गोतावळे, सामाजिक कार्यकर्ता नभिविलास भगत, सरपंच लिंबादास पतंगे, माजी उपनगराध्यक्ष अशपाक शेख, रामदास रणवीर, कृ.उ.बा.स. संचालक उत्तम कराळे, सरपंच नारायण वाघमारे, विष्णू रेड्डी, दिवाकर वेट्टी, लक्ष्मण कांबळे, चंद्रभान नरवाडे, वजीर सय्यद, यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

जिवतीतील बातम्या

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...