यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
Reg No. MH-36-0010493
.
घुग्घुस:
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील भाजपाच्या दुसऱ्या फळीतील ११ नेत्यांना निमंत्रित सदस्य म्हणून प्रदेश कार्यकारणीत स्थान मिळाले आहे.
यात निमंत्रित सदस्य म्हणून घुग्घुस येथील भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची वर्णी लागली आहे.
पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे शिष्य व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे कट्टर समर्थक असलेले विवेक बोढे यांनी घुग्घुस परिसरात ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र व ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्रच्या माध्यमातून नेत्ररुग्णांची तुकडी शस्त्रक्रियेसाठी पाठविणे, विविध आजारांच्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पाठविणे, आतापर्यंत रुग्णांची २० वी तुकडी रवाना करणे, जलसेवेच्या माध्यमातून नि:शुल्क पाणी पुरवठा करणे, मृतक विद्यार्थ्याच्या लाभार्थी कुटुंबियांना धनादेश मिळवून देणे, कर्करोगग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत करणे, अपघातग्रस्तांना आर्थिक मदत करणे, आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या अनाथ मुलांना आर्थिक मदत करणे, प्रसूत महिलेला मध्यरात्री रक्तदानाची मदत करणे, लाभार्थ्यांना धुरमुक्त चुलीचा लाभ मिळवून देणे, विद्यार्थ्यांना महाज्योती फ्री टॅब योजनेचा लाभ मिळवून देणे असे विविध सामाजिक कार्य विवेक बोढे यांनी केले आहे. त्याअनुषंगाने विवेक बोढे यांना नागरिकांनी देवदूत व आरोग्य सेवक ही उपाधी दिली आहे.
नवनियुक्त निमंत्रित सदस्य म्हणून विवेक बोढे यांची नियुक्ती झाल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपाचे निरंजन डंभारे, प्रवीण सोदारी, सुरेंद्र भोंगळे, पांडू थेरे, युवराज घोरपडे, मुस्तफा शेख, वामन डाहुले, सिनू कोत्तूर, हेमंत पाझारे, अनिल नीत, सुशील डांगे, भाजपा पदाधीकारी, महिला आघाडी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...