Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *राजमाता राणी हिराई...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*राजमाता राणी हिराई समाधी स्थळ परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात यावे.* *पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना गोंडवाना मातृशक्ती संघटनेचे निवेदन*

*राजमाता राणी हिराई समाधी स्थळ परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात यावे.*    *पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना गोंडवाना मातृशक्ती संघटनेचे निवेदन*

*राजमाता राणी हिराई समाधी स्थळ परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात यावे.*

 

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना गोंडवाना मातृशक्ती संघटनेचे निवेदन

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर :-  शहराच्या जननी, शक्तीदायिनी माता महाकाली मंदिराच्या निर्मात्या राजमाता राणी हिराई आत्राम यांच्या समाधी स्थळाचे सौंदर्यकरण करण्यात यावे या मागणीचे निवेदन गोंडवाना मातृशक्ती संघटनेच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार देण्यात आले.

चंद्रपूर हा गोंड राजांचा जिल्हा आहे परंतु या जिल्ह्यातील आदिवासी वीर वीरांगणांना दुर्लक्षित करण्यात येत आहे, चंद्रपूर शहराच्या जडणघडणीत राजमाता राणी हिराई आत्राम यांचा मोठा वाटा आहे, त्यांचे स्मारक ही चंद्रपुरात उभारण्यात यावे अशी मागणी गोंडवाना मातृशक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री मुनगंटीवार यांना केली.

गोंडवाना मातृशक्ती संघटनेच्या सर्व मागण्या मान्य करत राजमाता राणी हिराई आत्राम यांच्या समाधी स्थळाचे सौंदर्यकरण तथा त्यांच्या स्मारका संदर्भात तातडीने शासन आणि प्रशासन स्थरावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिष्टमंडळाला दिले.

याप्रसंगी पोंभुर्णा पंचायत समितीच्या माजी सभापती अल्का आत्राम, गोंडवाना मातृशक्ती संघटनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षा अर्चना खंडाते, विद्या सयाम, संगीता पेंदाम, रंजना मडावी, संगीता कुळमेथे, कल्पना मडावी, माया शेडमाके, सुरेखा किन्नाके, संगीता जुमनाके, शकुंतला शेडमाके, पुष्पा कुळमेथे, आश्रका कुमरे, संगीता सिडाम, आशा मडावी, वनिता आलाम, श्रावणा आलाम लता मडावी यांच्यासह गोंडवाना मातृशक्ती संघटना जिल्हा चंद्रपूरच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...