वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
परसोडा चुनखडक खान जमीन अधिग्रहण प्रकरण.
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
राजुरा:-- कोरपना तालुक्यातील मौजा परसोडा येथील चुनखडक खाणीसाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमीनी अधिग्रहना बाबत तसेच स्थानिक शेतकऱ्यांच्या या संदर्भातील मागण्यांवर मा. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याशी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे बैठक घेऊन चर्चा केली. यात आ. धोटे यांनी उपस्थित केलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत परसोडा येथे प्रस्तावित चुनखडक खान व्यवस्थापन सकारात्मक असून बैठकीत मे. आरसीसीपीएल प्रायव्हेट लिमिटेड, मुकुटबन चे व्यवस्थापक ए. आर. राठोड यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत.
कोरपना तालुक्यातील मौजा परसोडा व परिसरातील शेतकऱ्यांच्या प्रती सात/बारा वर कुंटुबातील एका व्यक्तीला कंपनीमध्ये त्यांच्या शैक्षणीक पात्रतेनुसार नौकरी देण्यात यावी, अधिग्रहित शेती परिसरातील स्थानिक भुमिहीन नांकरिकाना कंपनीमध्ये ८० टक्के रोजगार उपलब्ध करावा, कंपनी लगतच्या गावांना दत्तक घेऊन सामुदायिक विकास, मुलभुत सुविधा व इतर विकास कामे कंपनीने करून द्यावीत, कंपनीच्या चुनखडक खाणक्षेत्रात कंपनीच्या कांमामुळे निमार्ण होणाऱ्या शेतपिकाचे नुकसान आणि ब्लास्टींग किंवा बारूद स्फोटामुळे होणारी जिवीत व वित हाणीची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी कंपनीची असावी इत्यादी मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार परदेशी, जिल्हा भूसंपादन अधिकारी सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, सहायक जिल्हा खानिकर्म अधिकारी रोहन ठवरे, कोरपना तहसिलदार डॉ. विनोद डोनगावकर, खान व्यवस्थापक के. आर. राठोड, कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, उपसरपंच सतीश गोन्लावार, सतीश कातकर, गणेश मडावी, तमुस अध्यक्ष नेमचंद्र काटकर, मारोती गोडनवार, इसरी गुज्जेवार, मिलिंद बेंडले, गंगाधर मेकलवार, रमेश घंटीवार, अरुण मेघमवार, रमेश मेश्राम, अरुण कंटावार, रामभाऊ कोचाडे, सखाराम तलांडे, सागर कातकर, माजी उपसरपंच धर्मविर कातकर, सुधाकर कुमरे, मंगेश बांदुरकर, गंगारेड्डी कुंटावार, सुधाकर अग्रिकार असे स्थानिक शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...