आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचे गोंडवाना मातृशक्ती संघटनेच्या वतीने सत्कार
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात विदर्भ मराठवाडा, तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यातील भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या शक्तीदायीनी माता महाकांली मंदिराच्या जननी तथा चंद्रपूर शहराच्या जडणघडणीत ज्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे त्या राजमाता राणी हिराई यांच्या जयंती निमित्ताने जन्मोस्तव सोहळा तथा महिला मेळावा आणि विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा सत्कार समारंभ दि. 23 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला.
महिला या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करू शकतात परंतु त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे. व्यासपीठा अभावी त्यांच्या कलागुणांना वाव मिळू शकत नाही. अश्यावेळी महिलांनासाठी कार्यरत असणाऱ्या संघटनांनी पुढाकार घेऊन महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे असे प्रतिपादन या वेळी मान्यवरांनी केले.
गोंडवाना मातृशक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर च्या वतीने जिल्हातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध महिलांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला.
यावेळी गोंडवाना मातृशक्ती संघटनेच्या जिल्हाध्यक्ष अर्चना खंडाते, रामनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक लता वळिवे, जिवती नगरपंचायतीच्या नगरसेविका सतलूबाई जुमनाके, पोंभुर्णा पंचायत समितीच्या माजी सभापती अल्काताई आत्राम, गोंडी धर्मप्रचारिका रंजनाताई उईके, गोंडी धर्मप्रचारिका कल्पना चिकराम, वर्धा येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदनी धावंजेकर, जिवती नगरपंचायतीच्या नगरसेविका लक्ष्मीबाई जुमनाके, गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कन्नाके, संचालक ज्योतीराम गावडे, विजय तोडासे, राजू परचाके, प्रा. प्रकाश वट्टी, संकेत कुळमेथे, पलाश पेंदाम यांच्यासह जिल्ह्यातील महिला भगिनी तथा समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोंडवाना मातृशक्ती संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष रजनीताई परचाके आणि भावना आलाम यांनी प्रास्ताविक लताताई शेडमाके यांनी तर आभार प्रदर्शन विद्या सोयाम यांनी मानले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोंडवाना मातृशक्ती संघटनेच्या संगीताताई सिडाम, वनिता अलाम, पूजा परचाके, पुष्पा कुळमेथे, मनीषा परचाके, किरण पेंदोर, संगीता पेंदाम, उषा कोडापे, पौर्णिमा गेडाम, सुनीता उईके यांच्या सह जिल्हा आणि तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...