Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / मॉर्निंग वॉक करत असलेल्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

मॉर्निंग वॉक करत असलेल्या इसमाला टाटा एस उडविले, चंद्रपुर-घुग्घुस मार्गावरील घटना

मॉर्निंग वॉक करत असलेल्या इसमाला टाटा एस उडविले, चंद्रपुर-घुग्घुस मार्गावरील घटना

 

 

मॉर्निंग वॉक करत असलेल्या इसमाला पाणी घेऊन जाणाऱ्या टाटा एस टेम्पोने उडविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी चंद्रपुर-घुग्घुस मार्गावरील शांतीनगर जवळील डिके ढाब्याजवळ घडली आहे.या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून जखमीवर चंद्रपुरात उपचार केल्यानंतर नागपूरात हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान हसन ईस्तेखार अहमद शेख, याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आरोपी आकाश भगत याला घुग्घुस पोलिसांनी अटक केली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळच्या सुमारास तीन जण चंद्रपुर-घुग्घुस मार्गावर मॉर्निंग वॉक करत होते.अशातच विरुद्ध दिशेने पाणी घेऊन येणाऱ्या टेम्पो ने हसन अहमद शेख,याला जोरदार धडक दिली.यात हसन याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर चंद्रपुरात उपचार करून पुढील उपचारासाठी नागपुरात हलविले, मात्र हसन याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 

या घटनेची माहिती घुग्घुस पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व टाटा एस मॅजिक वाहनला, ताब्यात घेऊन आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. ही करवाई पोलिस निरीक्षक आसिफराजा बी. शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली निरंजन यांनी केली आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

 

 

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...