Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *मोदी सरकारच्या दडपशाहीच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*मोदी सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात आम आदमी पार्टी चंद्रपूर चा गांधी चौक येथे सत्याग्रह* अघोषित आणीबाणी आणि तपासयंत्रणांच्या कारवाई विरोधात आम आदमी पार्टी चा राज्यभर सत्याग्रह *केजरीवाल यांना सीबीआय ने दिलेल्या नोटिस विरोधात आप चा राज्यभर सत्याग्रह*

*मोदी सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात आम आदमी पार्टी चंद्रपूर चा गांधी चौक येथे सत्याग्रह*    अघोषित आणीबाणी आणि तपासयंत्रणांच्या कारवाई विरोधात आम आदमी पार्टी चा राज्यभर सत्याग्रह    *केजरीवाल यांना सीबीआय ने दिलेल्या नोटिस विरोधात आप चा राज्यभर सत्याग्रह*

*मोदी सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात आम आदमी पार्टी चंद्रपूर चा गांधी चौक येथे सत्याग्रह*

 

अघोषित आणीबाणी आणि तपासयंत्रणांच्या कारवाई विरोधात आम आदमी पार्टी चा राज्यभर सत्याग्रह

 

केजरीवाल यांना सीबीआय ने दिलेल्या नोटिस विरोधात आप चा राज्यभर सत्याग्रह

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर:- सीबीआय ने रविवार, १६ एप्रिल 2023 रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलवले असल्याने त्याचा निषेध करण्यासाठी आज आम आदमी पार्टी तर्फे राज्यभर सत्याग्रह करण्यात आला. तथाकथित एक्साईज घोटाळ्याच्या चौकशीसाठी यापूर्वीच सत्येंद्र जैन यांना ताब्यात घेतलेले असताना आता अरविंद केजरीवाल यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आलेले असल्यामुळे त्याच्या विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी आपचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रंगा राचूरे यांच्या नेतृत्वात राज्यभर सत्याग्रह करण्यात आला.

दिल्लीतील जनतेला जागतिक दर्जाचे शिक्षण आरोग्य तसेच मोफत वीज पाणी व महिलांना मोफत प्रवास देण्याचं काम अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने केलेले असल्यामुळे त्यांच्या मॉडेलला मोठ्या प्रमाणात जन मान्यता मिळत आहे. यापूर्वीच जगभर त्यांच्या कामाची स्तुती होत आहे. आता राष्ट्रीय पक्ष बनलेला आप देशभर वेगाने पसरत आहे त्यामुळेच मोदी सरकार आम आदमी पार्टीला अडचणीत आणण्याचे सर्व प्रयत्न करीत आहे असे यावेळेस सुनिल देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष

यांनी सांगितले.

दिल्ली विधानसभेमध्ये केजरीवाल यांनी अदानी आणि मोदी यांच्या संदर्भाने अनेक आरोप केले होते. मोदी यांच्यात काळ्या पैशाची गुंतवणूक अदानी यांच्या कंपन्यांमध्ये असल्याचा थेट आरोप केजरीवाल यांनी केला होता. तेव्हापासूनच अदानी यांना वाचवण्यासाठी केजरीवाल यांच्या विरोधात कट कारस्थान रचले जात होते, असा आरोप आपचे शहर अध्यक्ष योगेश गोखरे यांनी यावेळेस केला.

मोदी सरकार तपासयंत्रणा आणि न्याययंत्रणा या दोघांच्या मदतीने त्यांच्या विरोधातील आवाज दडपण्याचं काम करीत आहे. ज्या मद्यअबकारी धोरणाचा संदर्भ घेतला जात आहे, तेच मद्य विक्री धोरण पंजाब मध्ये जसेच्या तसे लागू करण्यात आलेले असून तेथे तब्बल ४० टक्क्याहून अधिक उत्पन्न वाढले आहे. या प्रकरणांमध्ये तपास यंत्रणा अनेकांवरती दबाव आणून त्यांना हवी तशी साक्ष देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. अबकारी धोरण हे निमित्तमात्र असून मोदी सरकारला केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीची धास्ती वाटत असल्यानेच हे दडपशाहीचे धोरण राबवले जात आहे. ही अघोषित आणीबाणीच आहे. त्याच्या विरोधात आणि सत्याच्या बाजूने आम आदमी पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरेल.

आजच्या गांधी चौक येथील आंदोलनात मनोहर पवार विदर्भ पदाधिकारी सुनील मुसळे जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर, भीवराज सोनी संघटन मंत्री चंद्रपूर, नागेश्वर गंडलेवार संघटन मंत्री चंद्रपूर, संतोष दोरखंडे सचिव चंद्रपूर, मयूर राईकवार युवा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, सुनिताताई पाटील महिला शहर अध्यक्ष, योगेश गोखरे शहर अध्यक्ष, राजू कुडे शहर सचिव, रवी पप्पुलवार शहराध्यक्ष बल्लारपूर, गणेश सिलगमवार शहर उपाध्यक्ष बल्लारपूर,सुधाकर गेडाम किसान सेल प्रमुख बल्लारपूर,अमित बोरकर शहराध्यक्ष घुगुस, रहमान शेख शहर उपाध्यक्ष,जस्मिन शेख महिला शहर उपाध्यक्ष, सिकंदर सागोरे शहर सहसंघटन मंत्री, संतोष बोपचे युवा शहराध्यक्ष, देवेंद्र अहेर युवा शहर सचिव, राजेश चेडगुलवार जिल्हा मीडिया प्रमुख, सुधीर पाटील शहर मीडिया प्रमुख, राजू चौरिया बूथ प्रमुख चंद्रपूर, अनुप तेलतुंबडे, चंदू माडुरवार, भीमराव मेंढे, जितेंद्र भाटिया, सरफराज शेख, आशिष गेडाम, सुजित चेडगुलवार, राजू काळे, शिरीन सिद्दिकी, सलमा सिद्दिकी, किरण खन्ना, सागर कांबळे, सुजाता देठे, सय्यद अश्रफ अली, रूपाताई काटकर,शबनम शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...