Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / भूक, भय व दास्यमुक्त...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

भूक, भय व दास्यमुक्त वैश्विक विचारधारा नष्ट करायची नसेल तर विश्ववंदनीय बाबासाहेबांच्या आदर्श आणि प्रेरणादायी संघटनेच्या घरट्यात परतूनी या असेआवाहन अशोक कुमार उमरे, रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक

भूक, भय व दास्यमुक्त वैश्विक विचारधारा नष्ट करायची नसेल तर विश्ववंदनीय बाबासाहेबांच्या आदर्श आणि प्रेरणादायी संघटनेच्या घरट्यात परतूनी या    असेआवाहन अशोक कुमार उमरे, रिपब्लिकन चळवळीचे  प्रचारक

भूक, भय व दास्यमुक्त वैश्विक विचारधारा नष्ट करायची नसेल तर विश्ववंदनीय बाबासाहेबांच्या आदर्श आणि प्रेरणादायी संघटनेच्या घरट्यात परतूनी या

 

असेआवाहन अशोक कुमार उमरे, रिपब्लिकन चळवळीचे  प्रचारक

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गडचांदुर:-बाबासाहेबांची संघटनात्मक वैचारिकता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समता सैनिक दल आणि दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया याच पक्ष संघटनेत आहेत. भूक, भय व दास्यमुक्त वैश्विक विचारधारा नष्ट करायची नसेल दूर तर विश्ववंदनीय बाबासाहेबांच्या आदर्श आणि प्रेरणादायी संघटनेच्या घरट्यात परतूनी या. असै भावनिकतेची कळकळीची विनंती रिपब्लिकन चळवळीचे प्रसिद्ध प्रचारक अशोककुमार उमरे यांनी मौजा सावंगी संगम तहसील चांदूर रेल्वे जि. अमरावती येथे दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलतानी व्यक्त केले. पंकजभाऊ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्याख्यान विचारपीठावर माजी सरपंच सुनील राऊत, शुभांगी दा. राऊत, नंदु जुबळे इत्यादी होते.

उमरे पुढे म्हणाले, बाबासाहेब म्हणतात_ आपल्या समाजातील पुढाऱ्यांवर अत्यंत मोठी जबाबदारी आहे. आपल्याला राजकीय सत्ता मिळाल्याशिवाय आपला सामाजिक व धार्मिक उद्धार होणे अशक्य आहे. आपला जो नाश झाला आहे, आपण आज हजारो वर्षे खितपत पडलो आहोत याचे कारण आपणांस राजकीय सत्ता नव्हती. ही सत्ता आपण मिळविली पाहिजे. राजकीय सत्ता ही अजब शक्ती आहे. आपल्या समाजात आपापसात फार मतभेद आहेत. आपापसातील मतभेद नाहिसे करा... एक गुण फार महत्त्वाचा, तो म्हणजे *बहुमताने ठरलेले सर्व मान्य करणे,* ही कृती राजकारणात फार आवश्यक आहे. माझ्या मताप्रमाणे जर कारभार चालला तर मी संस्थेत राहिल अशा प्रवृत्ती फार वाईट. राजकारणात भांडणे होतात ती विरून जाण्याची सवय ठेवली पाहिजे. असे विविध प्रकारचे बाबासाहेबांच्या विचारांचे दाखले देऊन व बाबासाहेबांच्या संघटनेची संघटनशक्ती बळकट करण्यासाठी आपले विचार व्यक्त केले.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्ध यांना अभिवादन करून सकाळी १० वाजता व्याख्यानाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल राऊत प्रास्ताविक शुभांगी राऊत आणि आभार प्रदर्शन नागेश्वर राऊत यांनी मानले.

जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने रिपब्लिकन चळवळीच्या जागृतीचा एक भाग म्हणून *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संविधान आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात सामील होण्यासाठी बाबासाहेबांनी आवाहन केलेले प्रमाणप्रत्र उपासिका आणि उपासक यांना भेट देण्यात आले.

कार्यक्रमास नागेश्वर राऊत, किशोर राऊत, दादाराव राऊत, रमेश चौधरी, बाळकृष्ण राऊत, सुनील र. राऊत, राजकुमार मेश्राम, शरद राऊत, संजय सवाई, सुनिता दा. राऊत, ज्योती राऊत, रेखा शं. राऊत, पार्वती दिलीप हरणे, वनिता नि. राऊत, प्रिती कि. राऊत, अस्मिता डोंगरे, दिपाली नि. राऊत, छाया राऊत, कल्पना मेश्राम, शीला सवाई, आरोशी सवाई, सानिया हरणे इत्यादींनी हजर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचा समारोप सामुहिक भोजन व बाबासाहेबांच्या प्रतिमांच्या मिरवणुकीने करण्यात आला.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...