रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
भाजपच्या विनोद नवलेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश.
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:-- लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी कोरपना आणि जिवती तालुक्याचा दौरा करून दोन्ही तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आणि व्यापक जनसंपर्कासह पक्ष बळकटीसाठी एकजुटीने कामाला लागण्याच्या सुचना उपस्थित कार्यकर्त्यांना केल्या, शेतकर्यांच्या समस्या आपण नेहमीच प्राधान्य क्रमाने सोडवतो तेव्हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बाजर समितीमध्ये आपल्या पक्षाच्या उमेदवारांना अधिक संधी कशी मिळेल यासाठी परिश्रम घेतले पाहिजे असे आवाहन केले. या प्रसंगी कन्हाळगांव चे उपसरपंच तथा भाजपचे महत्त्वाचे कार्यकर्ते विनोद नवले यांनी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृतावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शाल, श्रीफळ आणि काँग्रेस पक्षाचा दुपट्टा देऊन आ. धोटे यांनी त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी दत्त मंदिर देवघाट, कुसळी येथील हजरत हाजी अली रहमान उर्फ दुल्हेशाह वली, संत जगन्नाथ बाबा देवस्थान तुकडोजी नगर या सर्व ठिकाणी भेट देऊन दर्शन घेतले. स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. या प्रसंगी कृ. उ. बा. स. माजी सभापती श्रीधरराव गोडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, जिवती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, माजी सभापती श्यामभाऊ रणदिवे, माजी उपसभापती संभाजी कोवे, माजी जि प सदस्य सिताराम कोडापे, माजी सभापती सुग्रीव गोतावळे, माजी उपनगराध्यक्ष अशपाक शेख, माहीला काँग्रेस तालुकाध्यक्षा आशाताई कसारे, मुरलीधर बल्की, सरपंच नयना शिंदे, जेष्ठ नेते सुरेश मालेकर, शंकर पेचे, भारत चन्ने, रसूल भाई, संजय जाधव, अनिल गोंडे, भाऊजी चव्हाण, भोजू पा मडावी, माधव डोईफोडे, सरपंच सिताराम मडावी, नामदेव जुमनके, अजगर अली, वंदना बल्की, विठ्ठाबाई देवाळकर, गणेश गोडे, सचिन मालेकर, प्रकाश मोहुर्ल, तसेच दोन्ही तालुक्यातील काँग्रेसचे सरपंच, उपसरपंच, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...