रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
दोन्ही वाहनाचे वाहनचालक गंभीर रित्या जखमी: वाहतूक खोळबली
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना :- गडचांदुर कडून आदिलाबाद कडे जाणाऱ्या ट्रक चा टायर फुटल्याने समोरून येत असलेल्या तेलंगणा परिवहनच्या बसला समोरासमोर जबर एकमेकाला ठोस बसल्याने दोन्ही वाहनाचे वाहनचालक गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना कोरपना - चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग वरील कातलाबोडी फाटा येथे बुधवारी दुपारी बारा वाजता च्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, गडचांदुर येथून के टी सी कंपनीचा मालवाहू ट्रक क्रमांक एम एच ३४ पी जी ४१६६ हा आदिलाबाद कडे जात असताना कातलाबोडी फाट्याजवळ त्याचा टायर फुटला.त्यात अनियंत्रित होऊन दरम्यान आदिलाबाद कडून चंद्रपूर कडे जाणाऱ्या तेलगणा परिवहनच्या बस क्रमांक ए पी ०१ झेड ००८३ ला जबर समोरासमोर धडक बसली.यात दोन्ही वाहनाचे वाहनचालकाच्या पायाला गंभीर रित्या इजा पोहचली. त्यांच्यावर कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराथ चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. या दरम्यान चंद्रपूर - आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग वरील काही वेळ वाहतूक खोळंबली होती. नंतर पोलिसांनी रस्ता मोकळा करून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. घटनेचा पुढील तपास ठाणेदार संदीप एकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी नामदेव पवार व कोरपना पोलीस करीत आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...