Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / सुदृढ समाज निर्मितीसाठी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

सुदृढ समाज निर्मितीसाठी संतांच्या प्रबोधनाची आवश्यकता : आमदार सुभाष धोटे. कन्हाळगांव येथे श्रीभाद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते उद्घाटन

सुदृढ समाज निर्मितीसाठी संतांच्या प्रबोधनाची आवश्यकता : आमदार सुभाष धोटे.    कन्हाळगांव येथे श्रीभाद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते उद्घाटन

सुदृढ समाज निर्मितीसाठी संतांच्या प्रबोधनाची आवश्यकता : आमदार सुभाष धोटे.

 

कन्हाळगांव येथे श्रीभाद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते उद्घाटन

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना :-- कोरपना तालुक्यातील मौजा कन्हाळगांव येथे हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर श्रीभाद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन हनुमान देवस्थान कन्हाळगांव येथे करण्यात आले. या सप्ताहासाठी परमपूज्य बालयोगी आचार्य भागवत स्वामी गजेंद्रजी चैतन्यजी महाराज, लहरी बाबा संस्थान श्रीक्षेत्र मदापुरे जिल्हा अकोला व त्यांचे सहकारी स्वामी नारायण दत्त महाराज यांचे प्रवचन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे उद्घाटन लोकप्रीय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.

 या प्रसंगी उद्घाटनपर मार्गदर्शन करताना लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, सुदृढ समाज निर्मितीसाठी संत समाज आणि प्रबोधनकार यांची आजच्या काळात खूप आवश्यकता आहे. समाजातील संयुक्त कुटुंब पद्धतीला तडे पडत असल्याने माणसा माणसात द्वेषाचे भाव वाढीस लागले आहेत त्यामुळे समाजातील व्यक्तीने आदर्श जीवन कसे जगावे, सहसंबंध कसे जपावे, भौतिक व आध्यात्मिक प्रगती कशी करावी याचे प्रबोधन आचार्य भगवान गजेंद्र चैतन्य जी महाराज करतील. या सप्ताहाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

      या प्रसंगी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार वामनराव चटप, जेष्ठ काँग्रेस नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, काँग्रेस तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, सरपंच सुरेखा नवले, माजी सभापती नीलकंठ कोरांगे, माजी उपसभापती संभाजी कोवे, माजी सभापती सुरेश मालेकर, रमांकत मालेकर, अरुण नवले, नंदू गज्जलवार, सुनील बावणे, रत्नाकर चटप, विनोद नवले, तमुस अध्यक्ष मनोहर बावणे, डॉ. परचाके यासह समस्त गावकरी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...