खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता *(विनोद दुर्गे )
चंद्रपुर
बुधवार दि. ५ एप्रिल २०२३ रोजी पार्थशर समाचार या वृत्त वाहिणीचे पत्रकार नेमन धनकर यांना सहा. पोलिस निरीक्षक मिलींद गेडाम यांनी विनाकारण मारहाण केली, त्या सहा. पोलिस निरीक्षक मिलींद गेडाम यांना निलंबित करण्याची मागणी पत्र पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पोलिस अधिक्षकांना आज देण्यात आले. यावेळी चंद्रपुर श्रमिक पत्रकार संघ चे अध्यक्ष मझहर अली, डिजिटल मीडिया एसोसिएशन चे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चोरडिया, आशिष अंबाड़े, सारंग पांडे, राजेश सोलापन, सुनील तायड़े, विजय सिद्धावार, जितेंद्र जोगड, राजू बित्तुरवार, दिनेश एकवोंकर, राजेश नायडू, हिमायु अली, होमदेव तुम्मेवार, मोरेश्वर उदोजवार, मनोहर दोतपल्ली, तुलशीराम जाम्बुलकर, गणेश अडूर, करण कंदूरी, प्रशांत रामटेके, शंकर महाकाली, धम्मशील शेंडे, गौरव पराते, सुनील गेडाम आदि पत्रकारांची उपस्थिती होती. तसेच इतर सर्व पत्रकारांनी या घटनेचा निषेध नोंदविला आहे.
सविस्तर वृत्त असे की, पार्थशर समाचार या वृत्त वाहिणीचे प्रशिक्षार्थी पत्रकार नेमन धनकर आणि सुनिल देवांगण हे यात्रेमध्ये आलेल्या भाविकांना आंघोळीची पुरेसी व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली नसल्यामुळे उघड्यावर व अस्वच्छ पाण्यामध्ये आंघोळ करीत असतांना व्हिडीओ शुटींग करीत असतांना सब इन्स्पेक्टर मिलिंद गेडाम यांनी त्यांची कोणतीही विचारणा न करता त्यांना मारहाण केली व महाकाली मंदिर परिसरात पोलिस विभागाने स्थापित केलेल्या चौकीमध्ये या दोन ही पत्रकारांना घेऊन जाऊन त्याठिकाणी त्यांचेपाशी ओळखपत्र असुन सुद्धा त्यांना मारहाण करण्यात आली व त्यांचे मोबाईल हिसकून रेकॉर्डिंग आणि फोटो डिलीट करण्यात आले, याची माहिती पार्थशर समाचार चे मुख्य संपादक राजेश नायडु यांना मिळाल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष या चौकीला भेट देवून सदर पत्रकार हे पार्थशर समाचार साठी वृत्त संकलन करीत होते व त्यामुळे त्यांनी व्हिडीओ शुट करणे भाग असल्यामुळे ते व्हिडीओ शुट करीत असल्याचे प्रत्यक्ष सांगीतल्यानंतर सुद्धा गेडाम हे त्यांना एखाद्या आतंकवादी सारखे वागणूक देत होते. पोलिसांची पत्रकारांशी केलेली ही वागणुक ही निंदनीय आहे. म्हणून पत्रकारांना अपमानास्पद वागणुक देणारे पोलिस अधिकारी मिलिंद गेडाम यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, यासाठी पत्रकार संघातर्फे आज दि. ६ एप्रिल रोजी 12 वाजता पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगून निवेदन देण्यात आले.
पोलीस अधिकारी वर कारवाई न झाल्यास आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन चा मार्ग सुद्धा स्वीकारू शकतो असा इशारा डिजिटल मीडिया असोसिएशनच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.
तसेच या प्रकरणासाठी ज्या प्रकारे सर्व मीडियाचे पत्रकार न्यायासाठी एकत्रित झाले त्याबद्दल पार्थ शहर समाचार चे संपादक राजेश नायडू यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...