Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *मार्गात बदल करुन अश्वावर...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*मार्गात बदल करुन अश्वावर स्वार होऊन यमुनामाय पोहोचली आमदार किशोर जोरगेवार यांच्या भेटीला राजमाता निवासस्थानी*

*मार्गात बदल करुन अश्वावर स्वार होऊन यमुनामाय पोहोचली आमदार किशोर जोरगेवार यांच्या भेटीला राजमाता निवासस्थानी*

माता महाकाली महोत्सवाला दिला आशीर्वाद, यंदाच्या महोत्सवात होणार सहभागी*

 

 

*

 

चंद्रपुर:   चैत्र महिन्यात भरणाऱ्या महाकाली यात्रेला अश्वावर स्वार होऊन चंद्रपूरात पोहोचण्याची १८६० साली यमुनामाय यांनी सुरु केलेली पंरपरा आजही त्यांचे वंशज जपत आहे. नांदेड जिल्ह्यातील शेलगाव ते चंद्रपूर येथील महाकाली मंदिर असा यमुनामायचा प्रवास मार्ग होता. मात्र १६३ वर्षाच्या परंपरेत बदल करत पहिल्यांदाच मार्गात बदल करुन माता महाकाली महोत्सवाला आशीर्वाद देण्यासाठी यमुनामाय आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी दाखल झाल्या.

यावेळी त्यांच्यासोबत गोविंद महादेव उट्टलवार, लक्ष्मीबाई उट्टलवार, सुनील उट्टलवार, अनिल उट्टलवार, नरहरी उट्टलवार, राम पोतराजे, बळीराम पोतराजे, आनंद वाघमारे, गणेश गायकवाड, सुमन कदम, उत्तम लोहार, बाबुराव नांदेड आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी शेकडो भक्तांचीहि उपस्थिती होती. यावेळी माता महाकाली सेवा समितीचे अध्यक्ष अजय जयस्वाल, माजी नगरसेवक बलराम डोडाणी, अशोक मत्ते, सुर्यकांत खनके, मिलिंद गंपावार  यांनी सर्व भक्तांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.

     चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन चंद्रपूरात सुरु करण्यात आलेली माता महाकाली महोत्सवाची सुरवात माता महाकालीची महती राज्यस्तरावर पोहोचविणारी आहे.  राज्यभरासह मराठवाडा येथे माता महाकालीच्या भक्तांची संख्या अधिक आहे. चैत्र महिण्यात भरणा-या महाकाली  यात्रेत मराठवाड्यातील  हजारो भाविक चंद्रपूरात पोहोचत असतात.  हनुमान  जयंतीला यमुनामाय नांदेड जिल्ह्यातून महाकाली मंदिर येथे दाखल होते. १६३ वर्षापुर्वी ही पंरपरा यमुनामाय यांनी सुरु केली होती. आजही त्यांचे वंशज ही पंरपरा जपत असुन आता उट्टलवाड वंशातील ९३ वर्षीय यमुनामाय ही परंपरा समोर नेत आहे.

     दरम्यान आज हनुमान जयंतीला यमुनामाय शेकडो भक्तांसह माता महाकालीच्या दर्शनासाठी चंद्रपूरात दाखल झाली होती. नांदेड जिल्ह्यातील शेलगाव ते चंद्रपूरचे माता महाकाली मंदिर असाच प्रवास आजवर यमुनामयचा राहिला आहे. मात्र यंदा या प्रवास मार्गात यमुनामायने बदल केला आणि त्या चंद्रपूरात माता महाकाली महोत्सव सुरु करणा-या आमदार किशोर जोरगेवार यांच्या कोतवाली वार्डातील राजमाता निवासस्थानी दाखल झाल्या. विषेश म्हणजे मागील १६३ वर्षात पहिल्यांदा यमुनामायने आपल्या प्रवास मार्गात हा बदल केला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी परिवारासह आरती करत माता महाकालीची मूर्ती, शाल श्रीफळ देत यमुनामायचे  स्वागत करत आशीर्वाद घेतला.  

    चंद्रपुरात आमदार किशोर जोरगेवार यांनी माता महाकाली महोत्सवाला सुरवात केली आहे. मागच्या वर्षी सराफा असोशिएशनने दिलेल्या ९ किलोच्या माता महाकालीच्या चांदीच्या मुर्तीची सराफा लाईन ते माता महाकाली मंदिर अशी शोभायात्रा काढत महोत्सवाची सुरवात करण्यात आली होती. चार दिवस चाललेल्या या महोत्सवात नवरात्र दरम्यान जन्मलेल्या कन्यांना माता महाकाली महोत्सव समितीच्या वतीने चांदीचा शिक्का देण्यात आला होता. तर ९९९ कन्यांना भोजनदान करत महोत्सवाचा समारोप करण्यात आला होता. यावेळी शहरातून निघालेली माता महाकाली नगर प्रदक्षिणा शोभायात्रेत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे देखावे सादर करण्यात आले होते. याची दखल घेत आज यमुनामाय आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी पोहोचली. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आमदार नसतांनाही चैत्र महिन्यात भरणा-या यात्रेत मराठवाड्यातून येणा-या भाविकांच्या सोयी सुविधांसाठी पुढाकार घेतला होता. यातून त्यांनी महाकाली भक्तांची म्हणजेच महाकाली मातेची सेवा केली. आज ते आमदार आहे. त्यांनी माता महाकाली महोत्सवाला सुरवात केली आहे. ही चंद्रपूरकरांसह माता महाकालीचे भक्त असलेल्या मराठवाड्यातील नागरिकांसाठीही आनंद देणारी बाब आहे. या महोत्सवाची भव्यता नांदेडमध्ये बसुन आम्ही पाहत होतो. आमची आस्था या मातेच्या मंदिराशी जुळली आहे. हा महोत्सव केवळ चंद्रपूरकरांचा नसुन देशभरात राहणा-या माता महाकालीच्या भक्तांचा असल्याचे यावेळी यमुनामाय म्हणाली. आक्टोंबर महिण्यात आयोजित माता महाकाली महोत्सवात शेकडो भक्तांना घेऊन सहभागी होणार असल्याचेही यावेळी त्या म्हणाल्या. या प्रसंगी अम्मा उर्फ गंगुबाई जोरगेवार, कल्याणी किशोर जोरगेवार, रंजिता जोरगेवार यांच्यासह संपूर्ण जोरगेवार कुटुंबीय आणि यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची व माता महाकाली भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...