सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस, दि. ०६ एप्रिल.
येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात विविध कार्यक्रमांच्या आयोजनासह भाजपाचा ४३ वा स्थापनादिन शेकडो कार्यकर्त्यांच्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला, सेवा केंद्राच्या प्रांगणात स्थानिक जेष्ठ कार्यकर्त्यांच्या शुभहस्ते भाजपाचा झेंडा फडकविण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्थापनादिनानिमित्य केंद्रीय कार्यालयातून केलेल्या संबोधनाचे दूरदर्शनवर सामूहिक दृकश्रवण केले.
यासोबतच जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते बचत गटाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सौ. सुरेखाताई टिपले, सौ. अर्चनाताई पोहीनकर व सौ. प्रणालीताई बावणे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर अमराई वार्डातील वसंता सोळंके यांच्या चालत्या ट्रकचा टायर फुटल्यामुळे अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले त्यामुळे त्यांच्या पत्नी सौ. रेणुकाताई साळुंखे यांना आर्थिक मदत करण्यात आली. तसेच ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समितीच्या वतीने ५१ रुग्णांची २१ वी तुकडी ही सेवाग्रामला रवाना करण्यात आली. विविध आजारांसाठी या ५१ रूग्णांवर त्याठिकाणी शस्त्रक्रिया होणार आहे.
त्यानंतर सर्वच पदाधिकाऱ्यांनी शहरामध्ये घरोघरी भिंतीवर 'एक बार फिर से भाजपा सरकार' व 'एक बार फिर से मोदी सरकार' अशा घोषवाक्यांची चित्रे रेखाटली.
या कार्यक्रमावेळी मार्गदर्शनपर भाषणात जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सर्वांना पक्ष स्थापना दिनाच्या शुभेच्छा देत आपल्या सर्वच नेत्यांनी घालून दिलेल्या आदर्शांवर मार्गक्रमण करत राष्ट्रहित व जनकल्याणासाठी अविरत कार्यरत राहण्याचा संकल्प आपण सर्वजणांनी आज केला पाहिजे, असे आवाहन केले.
पुढे बोलताना, अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ नेत्यांच्या प्रोत्साहनाने आणि ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने भाजपाचा पाया रोवला गेला त्यानंतर नवोदित कार्यशीलच्या नेतेमंडळीच्या सहकार्याने पक्षाची आजतागायत भक्कम उभारणी झाली आहे. सद्यस्थितीत भाजपाची वाटचाल ही सेवा, समर्पण व अंत्योदयाचे व्रत बाळगून देशाच्या व जनतेच्या सर्वांगीण कल्याणासाठी सुरु आहे. मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वात भाजपच्या सेवाभावी कार्यकर्त्यांकडून अविरतपणे देशभर विविध सेवाकार्ये चालू आहेत आणि म्हणूनच भाजपा हा जनतेच्या हक्काचा पक्ष बनला आहे. असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, तालुका महामंत्री विजय आगरे, माजी जि.प. सभापती सौ. नितुताई चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, साजन गोहने, सौ. सुचिताताई लुटे, सौ. वैशालीताई ढवस, विनोद चौधरी, अमोल थेरे, रत्नेश सिंग, संजय भोंगळे, हेमराज बोंबले, गणेश कुटेमाटे, तुलसीदास ढवस, सतीश बोंडे, नितीन काळे, बबलू सातपुते, सचिन कोंडावार, प्रयास सखी मंचच्या अध्यक्ष सौ. किरणताई बोढे, सौ. सुनीताताई पाटील, अमीनादिदी बेगम, दिनेश बांगडे, अजय आमटे, प्रवीण सोदारी, गौरव ठाकरे, कोमल ठाकरे, पारस पिंपळकर, सुरेंद्र जोगी, सुरेंद्र भोंगळे, हसन शेख, राजेंद्र लुटे, विलास भगत, पिंटू चंदेल, संतोष कोंडपेल्लीवार, बंटी भोस्कर, हेमंत पाझारे, शाम आगदारी, विक्की सारसर, अनिल नीत आदींसह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते व स्थानिकांची उपस्थिती होती.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...