रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपुर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील परसोडा, कोठोडा (बु) येथील गावकरी आरसीसीपीएल कंपनी बंद पाडून चक्काजाम आंदोलनाच्या तयारीत असून 5 एप्रिलपासून बेमुदत धरणे उपोषण करणार आहेत.त्यामुळं कंपनी व्यवस्थापन व प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
परसोडा येथील RCCPL मुकुटबन कंपनीला दिलेली लीज रद्द करा, गावातून होणारी जड वाहतूक बंद करा, जिल्हाधिकाऱ्यांच्या व ग्रामपंचायत च्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी परसोडा गावातील नागरिकांनी आज बुधवारी आमरण उपोषण केले होते.त्यानंतर प्रशासनाला निवेदन दिले मात्र अद्यापही कारवाई न झाल्याने हे पाऊल उच्चल्या जात आहे. परसोडा येथील ग्रामसभेत RCCPL मुकुटबन कंपनीला ग्रामपंचायतने उत्खननाचे काम सुरू करण्यासाठी लीज दिली होती.मात्र अटी व शर्तीचे पालन न करता जमीन दलाला मार्फत खरेदी केल्या जात आहे.
RCCPL मुकुटबन सिमेंट कंपनीला परसोडा ग्रामपंचायतने खोदकाम करण्याअगोदर गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना 25 लाख रुपये एकर मोबदला देणे, एक सातबारा, एक नोकरी देणे, बेरोजगार युवकांना रोजगार देणे, जड वाहतूक, प्रदुषण कमी करणे आदी समस्यां सोडवण्यासाठी ग्रामपंचायत ने ठराव मंजूर केला होता.मात्र कंपनी प्रशासनाने अद्यापही गावातील नागरिकांच्या समस्या सोडविल्या नाही.उलट दलालांमार्फत शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन खोदकाम सुरू केले आहे.त्यामुळं ग्रामपंचायत ने दिलेली लीज रद्द करण्याचा ठराव ग्रामपंचायत ने घेतला असून चंद्रपुर चे जिल्हाधिकारी विनय गौडा याना तसे निवेदन पाठविण्यात आले आहे.
मात्र अद्यापही कंपनीकडून उत्खनन सुरूच असून जड वाहतूक सुरू आहे.तसेच प्रदूषणामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.त्यामुळं कंपनीला दिलेली लीज रद्द करा, गावातून होणारी जड वाहतूक बंद करा, आदी मागण्यांना घेऊन 5 एप्रिलपासून गावकरी बेमुदत धरणे उपोषण करण्याच्या तयारीत आहेत.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...