Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे कार्य अनमोल : आमदार सुभाष धोटे. आशा दिन उत्साहात: उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशांचा सत्कार.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे कार्य अनमोल : आमदार सुभाष धोटे.    आशा दिन उत्साहात: उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशांचा सत्कार.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे कार्य अनमोल : आमदार सुभाष धोटे.

 

आशा दिन उत्साहात: उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशांचा सत्कार.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तालुका आरोग्य विभाग राजुरा द्वारे आयोजित तालुका स्तरीय आशा दिन छत्रपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आशा स्वयंसेविका व आशा गट प्रवर्तक यांच्यासाठी प्रोत्साहनपर असे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी राजुरा तालुक्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या  आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक यांच्या सामाजिक संदेश असलेल्या रांगोळ्या, चित्रकला आणि सकस पोषक आहार साहित्य प्रदर्शनीचे निरीक्षण करून लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी उत्तम सादरीकरणाचे कौतुक केले.

       या प्रसंगी आमदार सुभाष धोटे मार्गदर्शन करताना म्हणाले की, आशा यांनी आपल्या नावाप्रमाणेच कोरोनाचा काळात संपूर्ण महाराष्ट्रात, देशात मोठे योगदान दिले. त्यांचे कार्य अनमोल आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून शासकीय उपक्रम यशस्वी करण्यासाठी त्या सदैव तत्पर असतात. त्यामुळेच कल्याणकारी राज्याची संकल्पना साकार होण्यास मदत होत आहे.

या प्रसंगी कार्यक्रमांचे अध्यक्ष संवर्ग विकास अधिकारी हेमंत भिंगरदेवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नगराळे, उपजिल्हा रुग्णालय राजुराचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहू कुळमेथे, डॉ. अशोक जाधव, गट शिक्षणाधिकारी मनोज गौरकार, बाल विकास प्रकल्प अधिकारी अमित मेश्राम, तालुका आरोग्य सहाय्यक डॉ. मधूकर टेकाम, डॉ. सचिन नळे, डॉ. ओम सोनकुसरे यासह अशा स्वयसेविका व गट प्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...