रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
गडचांदुर येथे १ कोटी ८० लक्षाच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण संपन्न.
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
कोरपना :-- लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते नगर परिषद गडचांदूर येथे १ कोटी ८० लक्षाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडले. यात प्रामुख्याने नगर परिषद गडचांदुर येथे सार्वजानक बांधकाम विभाग द्वारा समाजिक न्याय विभाग निधी अंतर्गत मौजा गडचांदूर येथील मेश्राम ले आऊट येथे सामाजिक सभागृहचे बांधकाम करणे किंमत २० लक्ष रुपये, नगरोत्थान योजना निधीअंतर्गत माणिकगढ सिमेंट कंपनी गेट पासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करणे, किंमत १ कोटी, न प गडचांदूर प्रभाग क्रमांक ७ मध्ये गोसाई चांदेकर यांचे दुकान ते शिवाजी धूपे यांचे घरा पर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे,किंमत १० लक्ष रुपये, न प गडचांदुर प्रभाग क्रमांक ७ मध्ये प्रफुल रामटेके ते मुस्कान हमीद यांचे घरा पर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली बांधकाम करणे, किंमत १० लक्ष रुपये, न प गडचांदुर शेख एजाज ते नयनसुख निरंजने यांचे घरा पर्यंत नाली बांधकाम करणे, किंमत १० लक्ष रुपये, न प गडचांदुर टिकले ले आऊट येथे सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करणे, किंमत १० लक्ष रुपये इत्यादी विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि न प गडचांदूर अंतर्गत २० लक्ष निधी खर्चून उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौंदर्यीकरण कामाचे लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या सौंदर्यीकरणातून गडचांदूर शहराच्या वैभवात भर पडलेली आहे. या वैभवाला साजेशी भव्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ प्रतिकृती आपण स्वखर्चाने येथे बसवून देऊ तसेच नगर सेविका जयश्री ताकसांडे यांच्या मागणीनुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सौंदर्यकरण करण्यात येईल असे आश्वासन आमदार सुभाष धोटे यांनी दिले. महापुरुषांचे विचार आणि जीवनतत्वे समाजाला प्रेरित करीत असतात. त्यांच्या प्रेरणेनेच आपण क्षेत्राच्या निरंजन विकासासाठी झटत असून महापुरुषांच्या प्रेरणेने नव्या जुन्या पिढीने प्रगती करावी ही अपेक्षा आहे. या प्रसंगी मूर्तिकार तथा कलाकार गणेश वनकर यांचा आमदार धोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वच्छोत्सव २०२३ अंतर्गत महिलांचा स्वच्छते मधील सहभाग व त्यांचे नेतृत्व वृद्धिंगत होण्यासाठी आणि सर्व नागरिकास स्वच्छतेचे महत्त्व आणि सवयी लावण्यासाठी स्वच्छतेची शपथ देण्यात आली. तसेच नगर परिषद गडचांदूर च्या २० महिला सफाई कामगार कर्मचाऱ्यांचे आ. धोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
या प्रसंगी नगराध्यक्षा सविता टेकाम, ज्येष्ठ नेते अरुण निमजे, माजी तालुकध्यक्ष विठ्ठल थीपे, बाळकृष्ण मोहितकर, उपनगराध्यक्ष शरद जोगी, नगरसेवक तथा गटनेता विक्रम येरणे, नगरसेवक राहुल उमरे, जयश्री ताकसांडे, अर्चना वांढरे, पापय्या पोनमवार, सचिन भोयर, शहराध्यक्ष संतोष महाडोळे, सागर ठाकूरवार, सर्वरभाई, महिला अध्यक्षा माधुरी पिंपळकर, रुपेश चुदरी, प्रा. आशिष देरकर, यु. काँ. तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, रोहित शिंगाडे, प्रितम सातपुते, उपविभागीय अभियंता आकाश बाजारे, मुख्यधिकरी विशाखा शेरखी, संदीप शुध्देवाड यासह गडचांदूर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...