सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस : शहरातील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्रतर्फे रुग्णांची २० वी तुकडी विविध आजारांवर शस्त्रक्रियेसाठी मंगळवार, २८ मार्च रोजी सकाळी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातून आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी (मेघे) ला भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात रवाना करण्यात आली.
याप्रसंगी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले, ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्रच्या माध्यमातून रुग्णांची २० वी तुकडी विविध आजारांवर उपचारासाठी व शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येत आहे. २० तुकडीच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्याचे कार्य ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून अहोरात्र सुरु आहे.
स्तनाचा आजार, पोटाचा आजार, मुखाचा कर्करोग, गर्भपिशवीचा कर्करोग, हर्निया, मुतखडा असे विविध मोठ्या आजरांच्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
रुग्ण सेवेचे कार्य हे ईश्वरीय कार्य आहे. रुग्ण सेवेचे कार्य ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून सतत सुरु आहे. येणाऱ्या ६ एप्रिलला भाजपाचा स्थापना दिवस आहे या दिवशी मोठी रुग्णांची तुकडी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार आहे त्याअनुषंगाने घुग्घुस परिसरातील नागरिकांनी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन केले.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे असगर खान, अजय लेंडे, आकाश येलपुलवार उपस्थित होते.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...