Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे २८ मार्चला दिल्ली येथे भव्य निदर्शने : डॉ. अशोक जीवतोडे केंद्र सरकारसी संबंधीत ओबीसींच्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याकरिता जंतर-मंतर मैदानावर भव्य निदर्शनाचा कार्यक्रम

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे २८ मार्चला दिल्ली येथे भव्य निदर्शने : डॉ. अशोक जीवतोडे    केंद्र सरकारसी संबंधीत ओबीसींच्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याकरिता जंतर-मंतर मैदानावर भव्य निदर्शनाचा कार्यक्रम

भारतीय वार्ता :

 

चंद्रपूर :

 

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे केंद्र सरकारसी संबंधीत मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याकरिता २८ मार्च २०२३ रोजी दिल्ली येथे जंतर-मंतर मैदानावर भव्य निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 

ओबीसी समाजाच्या संविधानीक मागण्या केंद्र सरकारकडे प्रलंबित असून या मागण्या केंद्र सरकारनी लवकरात लवकर सोडवाव्यात या करिता केंद्र सरकारचे केंद्राशी संबंधित मागण्यांकडे लक्ष वेधण्याकरीता राष्ट्रीय ओबीसी महासंघ दिनांक २८ मार्च २०२३ रोजी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर भव्य निदर्शने करणार आहेत.

 

सदर निदर्शने कार्यक्रम राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, ओबीसी युवा अध्यक्ष सुभाष घाटे, चेतन शिंदे, डॉ. प्रकाश भांगरथ, दिनेश चोखारे यांच्या नेतृत्वात घेण्यात येत आहे.

 

या निदर्शने कार्यक्रमात देशभरातील विविध राज्यातून सुमारे पाच हजार प्रतिनिधी सहभागी होतील, असा आयोजकांचा मानस आहे.

 

केंद्र सरकारसी संबंधीत ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्यांचा या आंदोलनात समावेश करण्यात आला आहे.

 

या निदर्शने आंदोलनाच्या निमित्ताने येणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. संविधानाच्या कलम २४३ D (६) व फलम २४३ T(६) मध्ये सुधारणा करून देशातील ओबीसी समुदायास लोकसंखेच्या प्रमाणात किंवा २७% राजकीय आरक्षण लागू करण्यात यावे. केंद्रामध्ये स्वतंत्र ओवीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी. केंद्र व राज्य सरकारी कर्मचान्यांना जुनी पेंशन योजना त्वरीत लागू करण्यात यावी. केंद्र सरकारच्या सर्व विभागातील ओबीसी संवर्गाचा नोकरीतील २७ टक्के जागा त्वरीत भरण्यात याव्यात. ओबीसी समाजाला नावण्यात आलेली क्रीमिनेवरची घटनाबाह्य अट त्वरीत रद्द करण्यात यावी व ती रद्द होईपर्यंत नॉन क्रीमिलेयरची मर्यादा २० लाख रुपये करण्यात यावी. रोहिणी आयोगाची अमलबजावणी करण्यापूर्वी जातनिहाय जनगणना करून केंद्र सरकारच्या सर्व विभागातील ओबीसी संवर्गातील राखीव २७% जागा पूर्णतः भरून व्हाईट पेपर जाहीर करावा व नंतर रोहिणी आयोग पूर्णतः वर्षात करावा. ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मध्ये आरक्षण लागू करण्यात यावे. मंडल आयोग, नशीपन समिती आणि स्वामिनाव आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्या. ओबीसी शेतकरी, शेतमजुरांना ६० वर्ष वयानंतर पेंशन योजना लागू करण्यात यावी. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार बहाल करण्यात यावा. ओबीसीसाठी लोकसभा व विधानसभा असे स्वतंत्र मतदारसंघ स्थापन करण्यात यावे. तहसील न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व न्यायिक स्तरांवर ओबीसींना आरक्षण लागू करण्यात यावे. ओबीसी प्रवर्गाचा अॅट्रासिटी कायद्यामध्ये समावेश करण्यात यावा. कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र बजेट आणि स्मार्टगाव योजना लागू करण्यात यावी. प्रत्येक तहसिल व जिल्हा स्तरावर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था करण्यात यावी. केंन्द्र व राज्य सरकारी कार्यालयातील ओबीसी संवर्गातील रिक्त पदांचा अनुशेष भरण्यासाठी स्वतंत्ररित्या मोहीम राबवून त्वरीत रिक्त पदे भरण्यात यावी व त्यासाठी सक्तीचा कायदा करण्यात यावा. सार्वजनिक उपक्रमाचे होत असलेले खाजगीकरण बंद करण्यात यावे. प्रशासन कार्यकारी कायदेमंडळ न्यायव्यवस्था आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व शाखात ओबीसींना आरक्षण देण्यात यावे, विशेषकरून न्यायव्यवस्थेतील तहसिल न्यायालय ने सर्वोच्च न्यायालयात सुद्धा ओबीसींना आरक्षण देण्यात यावे. ओबीसी संवर्गातील के.जी. ते पी.जी. पर्यंत मोफत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात यावे तसेच ज्यांचे उत्पन्न करपात्र उत्पन्नापेक्षा कमी आहे. त्यांच्याकरिता मोफत आरोग्य सुविधा देण्यात यावी. 23. केंद्रात व राज्यात एससी, एसटी प्रमाणे ओबीसी शेकल्यांना 100 टक्के सबसिडी योजना लागू करण्यात यावी. शेतमालाची खरेदी करण्याकरिता हमीभाव निश्चित करून एकाधिकार पद्धतीने खरेदी करण्यात यावे. महात्मा ज्योतिराव फुले यांचे समग्र वाडःमय १० रु. उपलब्ध करून देण्यात यावे. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये LLB व LLM च्या ऑलइंडिया कोट्यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना २७% आरक्षण देण्यात यावे. केंद्र सरकारने वार्षिक अंदाजे पत्रक तयार करतांना एससी, एसटी प्रमाणे ओबीसी प्रवर्गा करिता लोकसंखेच्या प्रमाणात निधीची तरतूद करावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.

 

वरील सर्व मागण्यांकडे केंद्र सरकारने लक्ष वेधण्याकरिता आणि सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ देशपातळीवर आंदोलन चालवित आहे. याचाच एक भाग म्हणून या निदर्शनाचा कार्यक्रम दिल्ली येथे जंतर-मंतर मैदानावर 28 मार्च रोजी 12 वाजता आयोजीत केलेला आहे, असे डॉ. अशोक जीवतोडे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...