सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस :
येथील प्रयास सखी मंच व भाजपा महिला आघाडीच्या वतीने घुग्घुस शहरात गुढीपाडवानिमित्त महिलांची भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. महिलांच्या दुचाकी रॅलीने शहर दुमदुमले.
दुचाकी रॅलीची सुरुवात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व ठाणेदार आसिफराजा शेख यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून प्रयास सभागृहातून झाली. बहिरमबाबा नगर, रामनगर, आंबेडकर नगर, शास्त्रीनगर, इंदिरानगर, गांधीनगर, सुभाषनगर, अमराई वार्ड, श्रीराम वार्ड, गांधी चौक, जुना बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मार्गक्रमण करीत प्रयास सभागृहात रॅलीचे समापन करण्यात आले.
महिलांनी मराठमोळ्या वेशभूषेत व डोक्यावर भगवा फेटा बांधून मोठया संख्येत रॅलीत सहभाग घेतला.
प्रयास सभागृहात गुढीपाडवा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महामंत्री नामदेव डाहुले, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी सभापती नितु चौधरी, माजी सरपंच संतोष नुने, माजी ग्रा. पं. सदस्य सिनू इसारप, लक्ष्मी नलभोगा, भाजपाचे विनोद चौधरी, संजय भोंगळे, हेमराज बोंमले, आशिष वाढई, दिनेश बांगडे, प्रवीण सोदारी, मुस्तफा शेख, अमीना बेगम, रवी चुने, हेमंत पाझारे, रज्जाक शेख, धनराज पारखी, सिनू कोत्तूर, शंकर सिद्दम उपस्थित होते.
प्रास्ताविक भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी केले.
मनोगत व्यक्त करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, घुग्घुस शहरातील महिलांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी भाजपाचा पदाधिकारी व कार्यकर्ता महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. महिलाओ के सन्मान में भाजपा मैदान में हा फक्त नारा नाही तर तो प्रत्यक्ष कृतीतून दाखवीण्याकरिता काम करत राहू. महिलांच्या सन्मानार्थ असे कार्यक्रम निरंतर पणे चालणार आहे. समाजाच्या सेवेसाठी, उन्नती व उत्थानासाठी भाजपाचे काम करण्यासाठी महिलांनी पुढे यावे. भाजपाच्या यशात महिलांचा आशीर्वाद आहे.
घुग्घुस शहरातील विकासाचे शिल्लक काम लवकरच पुर्ण करू. पुढल्या काळात शहर वासियांना २४/७ तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. सर्वांच्या आशीर्वादाने घुग्घुस शहराचा विकास करता आला. ग्रामीण रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात असून नवीन बसस्थानकाचे काम पूर्णत्वास आले आहे लवकरच नागरिकांच्या सेवेत रुजू करण्यात येणार आहे. घुग्घुस शहरालगतचा बायपास रस्त्याचा दुसरा टप्पा मंजूर झाला आहे. त्यामुळे शहरातून होणारी जडवाहतुकीची समस्या सुटणार आहे.
याप्रसंगी मुलींच्या नृत्याचा कार्यक्रम पार पडला तसेच विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयास सखी मंचच्या मार्गदर्शिका अर्चना भोंगळे, अध्यक्ष किरण बोढे, महिला आघाडीच्या वैशाली ढवस, सुचिता लुटे, सुषमा सावे, सुनीता पाटील, सारिका भोंगळे, सिमा पारखी, कविता आमटे, सौभाग्या तांड्रा, पुष्पा रामटेके, नाजमा कुरेशी यांनी प्रयत्न केले.
यावेळी मोठया संख्येत महिला उपस्थित होत्या.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...