Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / नागरिकांच्या मरणाची...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

नागरिकांच्या मरणाची वाट पाहत आहात काय ? राजुरेड्डी

नागरिकांच्या मरणाची वाट पाहत आहात काय ? राजुरेड्डी

स्व.अटल बिहारी वाजपेयी बगीच्यांचे शेड ही पडले

 

घुग्घूस : शहरात पंतप्रधान खनिज निधी अंतर्गत जवळपास दहा ते अकरा बाल उद्यानाचे निर्माण कार्य 2018 - 2019 साली मंजूर होऊन 2020 साली निर्माण कार्य पूर्ण झाले यापैकी दोन दिवसांपूर्वी जवळ - जवळ एक कोटी (99.87 लक्ष) रुपयांचा शहरातील सर्वात मोठा स्व. अटल बिहारी वाजपेयी उद्यानातला शेड कोसळला या शेड मध्ये बसण्यासाठी दोन लोखंडी बेंच सुद्धा लावण्यात आले आहे

जर अपघात प्रसंगी या बेंचवर नागरिक असते तर ?

यापूर्वी 16 मार्च रोजी तिलक नगर येथील शेड कोसळला एका आठवड्यात दोन शेड कोसळल्याने या कामाचा दर्जा व कामातील भ्रष्टाचार जनते समोर उघड झाला आहे

 

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानेच सदर बगीचे निर्माण करण्यात आले होते.

या बगीच्यांचे उदघाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2020 रोजी कोरोना काळातच करण्यात आले व जेम - तेम दोन ते तीन वर्षात कोटयावधी रुपयांचे हे बगीचे भंगार झाले आहे.

गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी भाजपच्या वतीने बगीचे दुरुस्तीचा श्रेय ही घेण्यात आला होता.

मात्र हे बगीचे भ्रष्टाचाराचे बळी ठरले या बगिच्यात छोटे - छोटे मुलं खेळायला जातात त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने याठिकाणी करण्यात आलेले काम अत्यंत सुनियोजित व टिकाऊ असायला पाहिजे होते

मात्र कमिशनखोरी मुळे सदर ठिकाणी अत्यंत खालच्या स्तराचे कार्य करण्यात आल्याने शहरात बगीच्यांचे दुरवस्था झाली असून बगीच्यातील शेड पडण्याची मालिकाच सुरू झाली आहे

सुदैवाने अजून पर्यंत कुठल्याही प्रकारे जीवितहानी झाली नाही

मात्र दोन ठिकाणी झालेल्या घटना लक्षात घेता उर्वरित बगीच्यांचे बांबुवर उभारलेले शेड पाडण्यात यावे व कोट्यवधी रुपयांच्या बांधकामात बोगसपणा करणाऱ्या ठेकेदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंतावर जनतेच्या कर चोरीचे गुन्हे दाखल करण्यात यावी या भ्रष्टाचारी ठेकेदार व अभियंत्यावर कारवाई संदर्भात पालकमंत्री यांनी लक्ष देऊन सदर दोषींवर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

तसेच काँग्रेसने पालकांना नम्र आवाहन केले असून पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या बगीच्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती होत नाही

तो पर्यंत या बगिच्या पासून लांबच रहा

आणि भ्रष्टाचारात लिप्त असलेल्या विरोधात निदान निषेध तरी नोंदवा अशी विनंती केली

याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर,सुधाकर बांदूरकर,रोशन दंतलवार,रोहित डाकूर,विजय माटला,सिनू गुडला,शहजाद शेख,अनुप भंडारी,बालकिशन कुळसंगे,देव भंडारी,कपील गोगला,सुनील पाटील,अंकूश सपाटे,संजय कोवे,रंजित राखुंडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...