Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / महाराष्ट्र राज्य धोबी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

महाराष्ट्र राज्य धोबी परीट समाज महासंघ सर्वभाषिक मा. डी.डी. सोनटक्के - संस्थापक अध्यक्षयांच्या अध्यक्षतेखाली कोरपना (जि. चंद्रपूर) कार्यकारणीद्वारे संत गाडगेबाबा जयंती संपन्न

महाराष्ट्र राज्य धोबी परीट समाज महासंघ सर्वभाषिक                                   मा. डी.डी. सोनटक्के - संस्थापक अध्यक्षयांच्या अध्यक्षतेखाली कोरपना (जि. चंद्रपूर) कार्यकारणीद्वारे संत गाडगेबाबा जयंती संपन्न

महाराष्ट्र राज्य धोबी परीट समाज महासंघ सर्वभाषिक                              

 

 मा. डी.डी. सोनटक्के - संस्थापक अध्यक्षयांच्या अध्यक्षतेखाली कोरपना (जि. चंद्रपूर) कार्यकारणीद्वारे संत गाडगेबाबा जयंती संपन्न

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

, 7498975136

कोरपना:-सोमवार दिनांक २०मार्च २०२३.  खऱ्या अर्थाने संपूर्ण जगताला मानवतेची शिकवण देणारे आणि माणसात देव शोधणारे सेवा योगी,कर्मयोगी,संपूर्ण जगाला शिक्षण, स्वच्छतेचे महत्व सांगत अंधश्रद्धेने बुरसटकेल्या समाजाचा उद्धार कसा होईल याची जाणीव करून देणारे व ज्यांच्या नावाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ स्थापन केले गेले असे चालते बोलते विद्यापीठ श्री. संत गाडगेबाबा यांची १४७ वी जयंती महोत्सवाचे आयोजन  दि. २०/०३/२०२३ रोज सोमवारला, संत गाडगे बाबा विचारमंच कोरपना, महा.राज्य धोबी परीट वरठी समाज महासंघ,कोरपना आणि नगरवसिय यांचे संयुक्त विद्यमाने  तालुका मुख्यालय कोरपना येथील घटे सेलिब्रेशन हॉल गाडगेबाबा नगर, येथे करण्यात आले ,असता आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना श्री. डी.डी. सोनटक्के साहेबांनी संत गाडगेबाबाच्या जिवनावर प्रकाश टाकत गाडगेबाबांनी तत्कालीन परस्थितीचा सामना करत कश्याप्रकारे समाजाला शिक्षणाचे तसेच स्वच्छतेचे महत्त्व सांगितले हे सविस्तर स्पष्ट केले तसेच.

आरक्षणबाबत बोलताना डॉ. भांडे समिती अहवाल २००२ स्पष्ट करत २००२ पासून ते २०१७ पर्यंत हा अहवाल मंत्रालयात कश्यारीतीने धूळ खात पडला होता परंतु २५ मार्च २०१७ ला आरक्षण संदर्भात ऐतिहासिक बैठक लागली त्या दिवसापासून ते दिल्ली दरबारी आरक्षण फाईल पाठवण्यापर्यंत करण्यात आलेला संघर्ष या बाबी सविस्तर स्पष्ट करण्यात आल्यात तसेच आज आपणास आपल्या समाजाचा सर्वागीण विकास साधायाचा असेल तर समाजाची एकजूट या शासनकर्त्या समोर दाखवावी लागेल याकरिता आपण  राज्यातील संपूर्ण समाज कश्याप्रकारे एकत्र करत आहोत या बाबी स्पष्ट केल्यात या प्रसंगी कार्यक्रमाचे  उद्घाटक म्हणून कोरपणा नगरीच्या प्रथम महिला नगराध्यक्ष सन्माननीय सौ. नंदाताई विजयराव बावणे तसेच श्री इस्माईल शेख उपनगराध्यक्ष कोरपना यांची प्रमुख उपस्थिती होती.तर प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय विजयराव चिंतामण बावणे (संचालक सीडीसीसी बँक चंद्रपूर) अशोकराव क्षिरसागर प्रदेश सचिव  , भय्याजी रोहनकर प्रदेश उपाध्यक्ष महा.राज्य धोबी परीट वरठी महासंघ,अनिलभाऊ  तुंगीडवार जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य धोबी परीट वरठी समाज  महासंघ चंद्रपूर , माननीय दिलिपजी थेटे विदर्भ कार्यकारणी सदस्य, सन्माननीय मनोहरराव चिंचोलकर (सचिव महासंघ चंद्रपूर),मा. वामनराव तूरानकर उपसरपंच नोकारी  ,मा.मुरलीधरजी तुरानकर , मा.श्री मारोतराव भोस्कर  गुरुजी , मा.श्री दिगांबर खडसे सर प्राचार्य व.ना.विद्यालय कोरपना,श्री गणेश गोडे सर विद्यार्थीप्रिय शिक्षक वसंतराव विद्यालय कोरपना ,श्री मीन्नाथ महाराज पेटकर(गुरुदेव सेवा मंडळ प्रचारक) ,यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी श्री संत गाडगेबाबा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी भव्य मिरवणुकीचे आयोजन कोरपणानगरीतून करण्यात आले होते. भजनी मंडळीच्या सात संगतीने होणारे ,गाडगे बाबांच्या वेशभूषेतील  सन्मानिय कैलास महाराज खडसान जिल्हा अकोला आणि दिलीपजी थेटे यांचे चौका- चौकातील  संत गाडगे बाबांचे शेवटचे कीर्तन   आणि बाबांच्या  विचाराचे  दशसूत्री संदेश फलक ,आणि बाबांचा पालखी रथ  रस्त्याच्या दुतर्फा हजारोंच्या संख्येने  उपस्थित जनसमुदायांचे लक्ष वेधून घेत होता. पालखी मिरवणुकीच्या यशस्वी आयोजनासाठी सौ मीनाताई मुके  आणि श्री रमेश मुके यांनी विशेष परिश्रमघेतल्याने पालखी सोहळ्याला मनोवेधक रूप प्राप्त झाले होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र झटणारे सन्माननीय भगवान पाटील शिरपूरकर , रामचंद्र पाटील भोस्कर यांनी जयंती महोत्सवानिमित्त आयोजित संपूर्णथाळी भोजन व्यवस्थेचे उत्कृष्ट व्यवस्थापन केले,यासाठी सर्व श्री भाऊराव पाटील कावडकर ,सुधाकर पाटील  कावडकर,संजय नांदेकर ,गणेश कावडकर,संदीप दुरुतकर ,मनोज कावडकर,बंडू तुरानकर,जयसिंग हिवरकर,विकास कावडकर,नितीन जगनाडे,विजय भोस्कर,विद्याताई राऊत,रेखाताई राऊत,पुष्पाताई भोस्कर, उमेश आणि लक्ष्मीकांत  तुरानकर,संतोष ताजने,रवी तुरानकर, गणेश आंबिलकर , राजू राऊत , राजू नांदेकर, भूषण आणि राहुल दोडके,प्रवीण राऊत,अशोक क्षिरसागर,सूरज आणि वैभव तुरानकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाचे  अतिशय नियोजनबद्ध आयोजन करीत  समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि  समाजातील लोकप्रतिनिधींच्या सत्काराचे यावेळी आयोजन करण्यात आले होते .यामध्ये रेखाताई भाऊराव आकनुरवार सरपंच ग्रा.पं. चनाखा,श्री वामनराव तुराणकर उपसरपंच ग्राम प. नोकारी , सौ सविता ताई संजय रेगुंटवार ग्राम पं. सदस्य भुरकुंडा, सौ लक्ष्मीबाई गौरव लोणारे ग्राम पं. सदस्य खामोना. श्री सुरेश नांदेकर तंटामुक्ती अध्यक्ष चनई बुद्रुक, श्री केशवराव आंबीलकर तंटामुक्ती अध्यक्ष मौजा माथा,या लोकप्रतिनिधींचा सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि गाडगेबाबांचे चरित्र पुस्तक देऊन करण्यात आला. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये चिरंजीव हार्दिक वामन तूराणकर याचा सुद्धा सत्कार करून गोड कौतुक करण्यात आले.जयंती महोत्सव निमित्याने स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते यात जिल्हा परिषद शाळा खैरगाव तालुका कोरपना येथील विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.या जयंती महोत्सव निमित्ताने समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे सौ आशाताई शिरपूरकर आणि देवराव पाटील शिरपूरकर या दाम्पत्यांनी गाडगे बाबांच्या विचारावर पाऊल ठेवून, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत, आपल्या मुलाला शिकविले , मुलगा व्हावा ऐसा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा , याप्रमाणे त्यांचे मुलाने पेट्रोलियम पदार्थ शुध्दीकरणात संशोधन करून  नावलौकिक मिळविला आहे.त्यानिमित्ताने या दाम्पत्याचा यावेळी शाल,श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते महासत्कार करण्यात आला. संत गाडगेबाबा यांच्या विचारावर आधारित बौद्धिक व्याख्यान, प्रवचन, मिरवणुकीत सहभागी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे  वाटप आणि शेवटी  स्वादिष्ट महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी कोरपना परिसरातील   समाज बांधव लाखोच्या संख्येने उपस्थित होते. श्री संत गाडगेबाबा जयंती महोत्सवाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात भव्य आणि दिव्य आयोजन पहिल्यांदाच झाल्याची भावना उपस्थित जनसागराने बोलून दाखवली.कार्यक्रमाच्या यशस्वीआयोजनासाठी बाबाराव पा. ताजने, भगवान पा. शिरपूरकर,रामचंद्र पा भोसकर ,संजय राऊत,भाऊराव पा. कावडकर ,देवराव पा. शिरपुरकर,मुरलीधर पा. तुरानकर ,श्यामरावजी मुके लटारी पा भोसकर, रामदास पा. नांदेकर, नत्थु पा जाधव,केशव पा अंबिलकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.  कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन ,  श्री विजय राऊत (उत्सव समिती संयोजक तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य धोबी परीट वरठी समाज महासंघ,चंद्रपूर  )यांनी  तर आभार प्रदर्शन सन्माननीय मनोहरराव  चिंचोलकर   (जिल्हा सचिव  महासंघ चंद्रपूर) यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  कोरपणा परिसरातील सर्व समाज बांधवांनी एक दिलाने परिश्रम घेतले

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...