Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / "त्या "तीन विद्यार्थिनींच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

"त्या "तीन विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना मिळणार प्रत्येकी 25000 सिनेट सदस्य डॉ. संजय गोरे यांचा पुढाकार

"त्या "तीन विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना  मिळणार प्रत्येकी 25000

 

सिनेट सदस्य डॉ. संजय गोरे यांचा पुढाकार

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

, 7498975136

 

राजुरा:-- गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सभेमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अपघात विमा संबंधीच्या विद्यापीठाच्या निर्णयाबाबत काय झाले. या संदर्भात सिनेट सदस्य डॉ. संजय गोरे यांनी प्रश्न उपस्थित केला. होता तसेच दरम्यानच्या काळात छत्रपती शिवाजी महाविद्यालय चिंचोली येथील कु. छगुना भूषण झाडे व कु.अंजली नंदलाल मेश्राम या दोन विद्यार्थिनींचे शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे परीक्षा देण्यासाठी जात असताना अपघाती निधन झाले तसेच आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथील कू.मधुमती सुरेश झाडे या विद्यार्थिनींचे वीज पडून निधन झाले या संदर्भात अपघाती निधन झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना विद्यार्थी अपघात निधी योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्याची मागणी डॉ. संजय गोरे यांनी सभेमध्ये केली होती.

दरम्यान या  तिन्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थी अपघात निधी योजनेअंतर्गत प्रत्येकी 25 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे.

यासंदर्भात सिनेट सदस्य डॉ. संजय गोरे यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाविद्यालय चिंचोली येथील विद्यार्थिनींचा प्रस्ताव विभागाकडे सादर केलेला होता. यासंदर्भात गोंडवाना विद्यापीठाच्या परिषेत्रातील विद्यार्थ्यांकरिता विद्यार्थी सुरक्षा कवच योजना कार्यान्वित व्हावी यासाठी डॉ. गोरे यांनी आग्रही मागणी केली होती.

आता विद्यार्थी सुरक्षा कवच योजनेचा लाभ  गोंडवाना परीक्षेत्रातील अंदाजे 73650 विद्यार्थ्यांना मिळणार असून सद्यस्थितीत 35.40 रुपये विद्यार्थी एवढा विमा आकारण्यात आला आहे सदर विद्यार्थ्यांचा जानेवारी ते जानेवारी असा विमा कालावधी राहणार आहे.उपरोक्त अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना  विद्यार्थी अपघात निधी योजनेअंतर्गत प्रत्येकी 25 हजार रुपयाची रक्कम प्रदान करण्यासंबंधीचे पत्र विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉक्टर शैलेंद्र देव यांनी दिनांक 18 मार्च 2023 ला काढले असून यासंदर्भात दोन्ही महाविद्यालयांच्या प्रशासनाने कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, सिनेट सदस्य डॉ.संजय गोरे व संचालक डॉ.शैलेंद्र देव व विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...