वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
शेतकऱ्यांना आवश्यक मदत व दिलासा द्या ; आमदार सुभाष धोटे.
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
राजुरा :-चंद्रपूर जिल्ह्य़ातील शेतकरी आपल्या ऐन शेतपिकांच्या काढण्यात व्यस्त असतांनाच अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान शेतकरी बांधवांना सहन करावे लागत आहे. या अवकाळी पावसाने राजुरा तालुक्यांसह क्षेत्रातील अनेक गावांमध्ये अचानक धुमाकूळ घातला. यात अनेक शेतकऱ्यांचे, नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहे तरी या सर्व नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार सुभाष धोटे यांनी चंद्रपूर जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शनिवार, रविवार ला अवकाळी पावसाने राजुरा, कोरपना, व क्षेत्रातील अनेक गावांमध्ये कहर केला. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने रब्बी पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. गहू, हरभरा, ज्वारी अशी रब्बी पिके जमीनदोस्त झाली. शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी अस्मानी सुलतानी संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी घरांचे छते कोसळल्याच्या तर अन्य काही नुकसान झाल्याच्या घटना आहेत. कोरपना तालुक्यातील अंतरगाव प्राथमिक शाळेचे छत कोसळले. सुदैवाने घटनेच्या वेळी शाळेत विद्यार्थी नसल्याने जीवितहानी टळली. या सर्व नुकसानीचे पंचनामे संबंध अधिकाऱ्यांनी तातडीने करून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, नागरिकांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे अशा सूचना आमदार सुभाष धोटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच सरकारनेही अविलंब नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात मदत करावी अशी मागणी केली आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...