वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर:
घुग्घूस शहर काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व काँग्रेस नेते सैय्यद अनवर यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांची भेट घेवून भारतीय जनता पक्ष नेत्याचा शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार संपूर्ण राज्यात उघड करण्याची विनंती केली आहे. भाजप नेत्याने शिक्षणाच्या पुरता खेळखंडोबा केल्याचा प्रकार चंद्रपूरात उघडकीस आला. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात भाजपाच्या पदाधिकारी असल्याने राजकारण्याचे अभय या नेत्याला मिळाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील फ्राड शिक्षक व भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा उपाध्यक्ष व घुग्घूस शहराचे अध्यक्ष विवेक बबनराव बोढे यांनी गेल्या काही वर्षापासुन राजकारणात वेळ देता यावा याकरिता आपल्या जागी शिकविण्यासाठी मासिक वेतनावर (भाडोत्री ) शिक्षक ठेवल्याचा धक्कादायक प्रकार संपुर्ण चंद्रपुर जिल्हात घुग्घुस काँग्रेस पक्ष व पत्रकारांनी उघडकीस आणला होता
सदर प्रकरणातील दोषी शिक्षक व मुख्याधिपिका यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात काँग्रेस पक्षाकडुन आंदोलन करण्यात आली पडोली पोलीस स्टेशनला तक्रार ही दाखल करण्यात आली
मात्र सदर प्रकरण हे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दबावाखाली पूर्ण प्रकरण दबवण्यात येत आहे.
चांदा शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत जनता विद्यालय साखरवाही येथे इयत्ता नववी वर्गाला इंग्रजी शिकविणारा अधिकृत शिक्षक विवेक बोढे यांनी अंदाजे पंचाहत्तर हजार प्रति माह रुपये शासनाकडून वेतन घेवून पंधरा हजार रुपयांचा शुभम कोयाडवार हा (भाडोत्री) शिक्षक ठेवून गेल्या चार वर्षांपासून विद्यार्थी व शासनाची फसवणूक करून शासनाचे लाखो रुपये वेतनस्वरूपी लुटले आहेत.
सदर भ्रष्टाचारात शाळेची मुख्याध्यापिका पेटकर ही सुद्दा सहभागी आहे.
बहुजनांच्या मुलांना मिळणाऱ्या मोफत शासकीय शिक्षणात भाजपचे नेते भ्रष्टाचार करीत विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळत असून भाजपची ही निचता संपूर्ण महाराष्ट्राला व जनतेला कळावी याकरिता घुग्घूस शहर काँग्रेस कमिटतर्फे मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांची भेट घेवुन त्यांना प्रकरणाची पूर्ण माहिती देऊन सदर गंभीर प्रकरणाला आयल्या पातळीवर उठविण्याची विनंती केली आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...