रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
कर्जाची आमिष देऊन फसविणारा अनिल चांदेकर गजाआड
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर/कोरपणा:- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कोरपना व जिवती येथून कर्ज काढून देतो म्हणून बोरगाव येथील
गीताबाई कोटणाके यांना फसविल्याची फिर्याद कोरपना पोलिसाकडे दाखल केली अ.प. क्र ६४ / २३ कलम 420 भादवी अंतर्गत दिनांक 16/ 3/ 2023 लागुन्हा दाखल करण्यात आला असून अनिल उर्फ प्रफुल चांदेकर रा,पिंपरी यांना कोरपना पोलिसांनी अटक करून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी कोरपना येथे सादर केले असता पोलिसांच्या मागणीनुसार आरोपी अनिल यांचा २ दिवसाचा पिसिआर घेण्यात आला अनिल यांचे अनेक फसवणुकीचे प्रकार या निमित्ताने उघड होणार असून या भागातील लोकांना बँकेची नोकरी लावून देतो माझे पदाधिकारी व बँक अधिकाऱ्याशी जवळचे चांगले संबंध आहे असे सांगून तुम्हाला पाहिजे तेवढे कर्ज मिळवून देतो तसेच गृह कर्ज मिळवून देतो तसेच विशेषता आदिवासी भागातील आदिवासी कुटुंबांना कर्जाची गरज ओळखून एका बँक संचालकाचे मधुर संबंध यामुळे विश्वास ठेवून अनेक लोकांची फसगत केली आहे मरका गोंदी कारगाव बोरगाव कोरपना मांडवा पारडी वनसडी सहकारी संस्थेमध्ये कर्जमाफी व रूपांतर कर्जामध्ये अनेकांची फसवणूक झाली आहे गीता कोट नाके यांना तीन लाखाचे कर्ज मिळवून देतो म्हणून ५०हजार रुपये घेतले व मी बँकेचा मॅनेजर आहे असे सांगून बँक शाखेमध्ये त्यांना घेऊन गेले व तुमचे कर्ज जिल्हा मुख्यालयातून कर्ज मंजूर होणार आहे व तुमच्या खात्यावर तीन लाख जमा होईल व याचा ओटीपी मोबाईलवर आल्यानंतर तुम्ही उचलू शकता असे म्हणून चंद्रपूर मध्ये एका व्यक्तीकडे घेऊन गेले मात्र यांच्या कारभारावर संशय आला गीताबाईंनी चंद्रपूर मुख्यालय व कोरपना जिवती शाखेत चौकशी केली असता बँकेत कर्ज मंजूर किवा कर्ज प्रकरण नसल्याचे त्यांना सांगण्यात आले यामुळे फसवणूक झाल्याचे दिसतात पोलिसात तक्रार दाखल केली जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत दलालांचा बोलबाला यामुळे अनेकांची फसगत होत असल्याची चर्चा सुरू आहे बॅक कर्मचारी यांची जवळीक दाखवून दिशाभुल केल्या जात असे असाच प्रकार कोरपना येथील आदिवासी नामदेव कुंबरे यांना सुद्धा पीक कर्ज पन्नास हजार दिले असताना त्यांना तीन लाख पस्तीस कर्ज वसुलीचे नोटीस मिळाल्याने त्यांच्या कुटुंबात धाकधूक वाढली त्यांनी सुद्धा तक्रार दाखल केली शेतकऱ्याची बँक म्हणून मोठे आशेनी पाहिल्या जाते बँकेत शेतकऱ्याचे फसगतीचे प्रकार सातत्याने वाढ होत असून कोरपणा बँकेत 2021 मध्ये स्वय रोजगार म्हणून व्यावसायिक कर्ज अनेक लोकांना५०हजार रुपये वाटण्यात आले मात्र या कर्जाचा बट्ट्या बोळ झाला असून अनेकांची दुकाने सुरू झाले नाहीत ठाणेदार संदीप एकाडे याच्या मार्गदर्शनात पोलीसानी पीसीआर घेऊन चौकशी सुरू केल्यामुळे अनेक गैर प्रकार उघड होण्याची व फसवणुकीच्या प्रकाराला चोप बसण्यासाठी कार्यवाही गरजेचे असल्याचे चर्चा परिसरात सुरू आहे
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...