Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *बिगर व्यावसायिक शिक्षण...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ओबीसी वसतीगृहात प्रवेश* *राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे*

*बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ओबीसी वसतीगृहात प्रवेश*    *राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे*

भारतीय वार्ता :गजेंद्र काकडे 

 

चंद्रपूर :

 

इतर मागास बहुजन कल्याण खात्यामार्फत चालवण्यात येणाऱ्या वसतिगृहात व्यावसायिक आणि बिगरव्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. शिंदे-फडणविस राज्य सरकारच्या या निर्णयाचे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी स्वागत केले आहे.

 

ओबीसींचे वसतिगृह केवळ व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांसाठी उपलब्ध होईल, अशी अट असल्याने अन्य विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित झाला होता. वरिष्ठ सदस्य छगन भुजबळ यांनी (दि.१५) ला विधानसभेत या प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भुजबळ यांनी केलेल्या सूचना संबंधित खात्याला देण्यात येतील. वसतिगृहात व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांना प्राथमिकता दिली जाईल, पण इतरांनाही वसतिगृहात प्रवेश देण्यात येईल, असे सांगितले.

 

राज्य सरकार 'ओबीसी', 'व्हीजेएनटी' आणि विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींसाठी वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण, या केवळ व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांसाठी असतील, अशी अट घातली होती. अशा स्थितीची अकरावी, बारावी व इतर पदवीधर बिगरव्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित झाला होता. ५४ टक्के ओबीसींना खूप विलंबाने वसतिगृह मिळत आहे. त्यात अशी अट घालून कसे चालणार. ग्रामीण भागात शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नसल्याने विद्यार्थी शहरात येतात. तेव्हा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांनासुध्दा वसतिगृह प्रवेश दिला गेला पाहिजे, अशी मागणी होती. त्यामुळे या मागणीची दखल घेवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांनाही ओबीसी वसतीगृहात प्रवेश मिळेल, अशी माहिती दिली आहे. या निर्णयाचे ओबीसी विद्यार्थ्यांच्या वतीने डॉ. अशोक जीवतोडे यांनी स्वागत केले आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...