Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / यशवंतराव चव्हाण मुक्त...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे घरकुल मंजुर करा. आमदार सुभाष धोटेंची अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणी.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे घरकुल मंजुर करा.    आमदार सुभाष धोटेंची अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणी.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे घरकुल मंजुर करा.

 

आमदार सुभाष धोटेंची अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणी.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

राजुरा:-- महाराष्ट्र शासनाने भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत घरकुल लाभार्थ्यांच्या यादीस ८ फेब्रुवारी २०२३ रोजी मंजुरी दिली. सदर यादीत चंद्रपूर जिल्ह्य़ातील फक्त बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील लाभार्थी असल्याने जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील लाभार्थ्यांवर अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. भटक्या जाती जमाती, इतर मागास बहुजन कल्याण विभागाने दिनांक २४ जानेवारी, २०१८ च्या शासकीय परिपत्रकानुसार यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत घरकुल देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दिनांक ८ फेब्रुवारी, २०२३ च्या शासकीय परिपत्रकानुसार जिल्हातील काही विशिष्ट तालुक्यातील लाभार्थ्यांचा समावेश असल्याची बाब उघडकीस आली याबाबत राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.

      जिल्हातील प्रधानमंत्री आवास योजने मधून सुटलेले व इतर योजनेत सामाविश्ट नसलेल्या नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी जिल्हास्तरावर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत अर्ज मागविले होते. सदरहू अर्ज पालकमंत्री यांच्या  निर्देशानुसार जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी मुल १९५४ पोंभूर्णा - ४९२ बल्लारपूर- - २५७ कोरपना - ११४७ राजुरा- १३४८ चंद्रपूर- १०० वरोरा-११४५ गोंडपिपरी -८१५ असे एकूण ७२५८  प्रस्ताव अप्पर मुख्य सचिव, इमाव बहुजन कल्याण, विभाग, मंत्रालय मुंबई यांचे कडे सादर करण्यात आले. मात्र शासन स्तरावर मंजुरी देत असताना बल्लारपूर, पोंभूर्णा व मूल तालुक्यातील यादीला मंजुरी देऊन इतर तालुके वगळण्यात आले त्यामुळे जिल्ह्यातील इतर तालुक्यातील भटक्या जमातीतील नागरिकांवर शासनाकडून घोर अन्याय झालेला आहे. भटक्या जमातीतील गोर गरीबांना हक्काचे घर असावे यासाठी शासनाने योजना तयार केली आहे मात्र योजनेचा लाभ देताना मोठ्या प्रमाणात दुजाभाव होत असल्याने प्रत्यक्षात जिल्हातील अनेक गरजू लाभार्थ्यांना या घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे गोर - गरीब लाभार्थ्यांवर मोठा अन्याय झालेला आहे. अजूनही अनेक लाभार्थी कुळाच्या, मातीच्या कच्च्या घरामध्ये वास्तव्य करीत आहेत. चंद्रपूर जिल्ह्य़ातील अन्य तालुक्यातील घरकुलापासून वंचित असलेल्या भटक्या जमातीतील गरजू लाभार्थीना न्याय मिळणेसाठी राजुरा विधासभाक्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी लक्षवेधी द्वारे या गंभीर बाबी कडे शासनाचे लक्ष वेधले.

         यावर उत्तर देताना संबंधित खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, प्राप्त प्रस्तावाला मंजुरी दिली आहे परंतु या उत्तरांनी समाधान न झाल्याने पुनछ प्रश्न विचारून चंद्रपूर जिल्हातील उर्वरित तालुक्यातील घरकुलांना कधी मंजुरी देणार का? असा प्रश्न केला असता लवकरच उर्वरित सर्वच प्रस्ताव मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...