आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
चंद्रपूर/सावली:सावली तालुका काँग्रेस कमिटी सावलीच्या वतीने काल दिनांक १२ मार्च २०२३ ला. आसोलमेंढा,पाथरी येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
मेळाव्याला पक्षातील सर्व ज्येष्ठ, युवा व महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती या संवाद मेळाव्यात नोंदवली. पक्षातील सर्व स्तरातील पदाधिकारी,लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष तळागाळात मजबूत व सक्षम करण्यावर काँग्रेसने नेहमी भर दिला आहे.हा मेळावा सुद्धा त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे.
आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांचे म्हणणे मनमोकळेपणाने ऐकून घेतले.व कार्यकर्त्यांनी दिलेल्या सूचना अमलात आणून जन हिताचे अनेक अभियान आगामी काळात हाती घेण्यात येणार आहे. आणी विशेष करून मतदारसंघातील युवकांना अधिक सक्षम करण्यासाठी प्रामुख्याने विशेष उपक्रमांची आखणी करण्यात येणार आहे.असा विश्वास आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी बोलून दाखविला.
ब्रम्हपुरी विधानसभेतील तीनही तालुक्यात वेळोवेळी गाव प्रमुखांचा मेळावा पार पडत आहे. मेळाव्यामुळे कार्यकर्त्यांना दिशा आणि ऊर्जा मिळत असून गाव पातळीवरील अनेक समस्यांचा निपटारा सुद्धा वेगाने होत आहे.
मा.राहुलजी गांधी यांनी ३५७० किलोमीटर पायी प्रवास करून देशाला जोडण्यासाठी मोठे अभियान सुरू केले. भारत जोडो यात्रा पूर्ण झाली असली तरी यात्रेचा उद्देश अजून पूर्ण झालेला नाही. राहुलजी गांधी यांचे विचार व संदेश जो पर्यंत देशातील प्रत्येक घरापर्यंत पोहचणार नाही, तो पर्यंत यात्रा पूर्ण झाली असे म्हणता येणार नाही. प्रचंड आत्मविश्वास, धैर्य, त्याग आणि समर्पणाची भावना ठेवून राहुलजी गांधींनी भारत जोडो यात्रा पूर्ण केली. आता राज्यातील प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने हीच भावना ठेवून "हाथ से हाथ जोडो" अभियान यशस्वी करावे हे आवाहन आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी कार्यकर्त्यांना केले.
ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाने विकासकामे पूर्ण करण्यात आघाडी घेतली आहे. विकासकामात अडथळे आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून अनेक प्रयत्न केले जात असले तरी त्यांना यश येणार नाही. मतदारसंघातील विकासकामांची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहचवणे आवश्यक आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी नागरिकांमध्ये मिसळून संधी मिळेल त्या व्यासपीठावरून विकासकामांची माहिती जनतेला देण्याचा प्रयत्न करावा.
ब्रम्हपुरी मतदारसंघातील तरुण तरुणींना सक्षम करण्यासाठी विशेष नियोजन करून विविध उपक्रम हाती घेतले आहे. ज्यामध्ये युवक युवतींना मोटीवेशन, कॉन्फिडन्स बिल्डिंग व प्लेसमेंट रेडीनेस बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिक्षित युवक युवतींना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता व पात्रतेनुसार नोकरी करण्याची संधी मिळावी हा उद्देश पुढे ठेऊन भव्यदिव्य "जॉब महोत्सव २०२३" आयोजित करण्यात येत आहे. आपल्या गावातील जास्तीत जास्त तरुणांना जॉब मिळावा यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन जॉब महोत्सवाची माहिती उमेदवारांपर्यंत पोहचवण्याची तयारी करावी. सदर जॉब महोत्सवात देशातील ५० पेक्षा अधिक नामवंत कंपन्या सहभागी होणार असून ५००० पेक्षा जास्त उमेदवारांना नोकरी मिळणार आहे.असे प्रतिपादन आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी संवाद मेळाव्याचा प्रसंगी केले आहे. या वेळी सर्व जेष्ठ नेते, सर्व सेलचे पदाधिकारी,गाव काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष,सरपंच, नं.प.सावलीचे नगरसेवक,महिला आघाडी,युवा कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...
*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*सावली शहर वासियांचा विजयी निर्धार* *प्रचारसभेत व्हीजेएनटी काँग्रेस प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवीताई रेनके तथा युवक...