Home / चंद्रपूर - जिल्हा / क्रांतिवीर बाबुराव...

चंद्रपूर - जिल्हा

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचे बलिदान भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे :गजानन पाटील जुमनाके वीर बाबुराव शेडमाके कोण थे - चांदागड के शेर थे च्या घोषणेने दुमदुमला चंद्रपूर

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचे बलिदान भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे :गजानन पाटील जुमनाके    वीर बाबुराव शेडमाके कोण थे - चांदागड के शेर थे च्या घोषणेने दुमदुमला चंद्रपूर

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचे बलिदान भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे :गजानन पाटील जुमनाके

 

वीर बाबुराव शेडमाके कोण थे - चांदागड के शेर थे च्या घोषणेने दुमदुमला चंद्रपूर

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

चंद्रपूर :- 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांची जयंती चंद्रपूरात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. भव्य मिरवणूकांचे आयोजन करून आदिवासी बांधवांना क्रांतिविरास मानवंदना दिली.

या प्रसंगी बोलताना क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या इतिहास लपवून न ठेवता तो पुढे येऊ द्यायला हवा, त्यांच्या पराक्रम आजची युवा पिढी ही विसरत चालली आहे, त्यामुळे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचा खरा इतिहास आदिवासी बांधवांपुढे येणे काळाची गरज आहे कारण त्यांचे बलिदान भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे असल्याचे मत गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था जिवतीचे अध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी केले.

पुढे जुमनाके बोलताना म्हणाले की क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादन करण्यासाठी झालेली गर्दी  ही समाजपरिवर्तनाची नांदी आहे. अश्या प्रकारेच समाजाने एकत्रित राहून अन्याय अत्याचाराच्या विरोधात सतत लढा देत राहण्याचे आवाहन केले.

ग्राम आरोग्य सेना फॉउंडेशन संचालित गोंदोला समूह तथा गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्था चंद्रपूर च्या वतीने चंद्रपूर शहरामध्ये भव्य मिरवणूक काढत क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्त 16 ढेमसा 18 वाजा दंडोस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते, या मिरवणूकीमध्ये गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था जिवतीचे अध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी शेकोडो कार्यकर्त्यांसह सहभाग घेतला.

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात मिशन पोस्ट ग्रॅज्युकेशन या उपक्रमाअंतर्गत गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्था चंद्रपूर व गोंदोला समुहाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था जिवतीचे सचिव बापूरावजी मडावी, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मनोज आत्राम, जिवती नगरपंचायतीच्या नगरसेविका सतलूबाई जुमनाके, राज गोंडवाना गडसंरक्षण समितीचे अध्यक्ष भीमराव पाटील जुमनाके, नगरसेविका लक्ष्मीबाई जुमनाके, गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेचे जिल्हाध्यक्ष सुधाकरजी कन्नाके, गोंदोला संस्थापक डॉ. प्रवीण येरमे, डॉ. शारदा येरमे, जिवतीचे माजी सभापती भीमरावजी मेश्राम, गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेचे संचालक ज्योतीरावण गावडे, विजय तोडासे, राजू परचाके, लिंगोराव सोयाम, संजय तोडासे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे माजी युवा जिल्हाध्यक्ष गणपत नैताम, कोरपना तालुका प्रसिद्धी प्रमुख संकेत कुळमेथे, गोंडवाना मातृशक्ती संघटनेच्या रजनीताई परचाके, कविता सोयाम, शशिकला वट्टी, सामाजिक कार्यकर्ते संजय सोयाम, सुधाकरजी कूसराम, लक्ष्मण चिकराम, शिवाजी नैताम, प्रकाश शेडमाके, विठ्ठल मडावी, नितीन बावणे, प्रवीण मडचापे, मंगेश सोयाम, मंगेश पंधरे यांच्यासह लाखो आदिवासी बांधव उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...