Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / शिवमहोत्सव समिती चंद्रपूर...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

शिवमहोत्सव समिती चंद्रपूर द्वारा शिवजयंती आयोजक मंडळांचा सत्कार सोहळा संपन्न* ======================

शिवमहोत्सव समिती चंद्रपूर द्वारा शिवजयंती आयोजक मंडळांचा सत्कार सोहळा संपन्न*  ======================

 

             °°°°°°°°°°°°°

*

 विशेष प्रतिनिधी: गजेंद्र काकडे 

*चंद्रपूर*:-शिवमहोत्सव समितीद्वारे चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या पंधरा वर्षापासून विविध उपक्रम राबवून समाज सांस्कृतिकदृष्ट्या समृध्द व्हावा याकरीता प्रबोधनात्मक कार्यक्रम म्हणून महापुरूषांच्या जीवनावर व त्यांच्या कार्यावर आधारित व्याख्यानमाला आयोजित करून प्रबोधनाचे काम करीत आहे.          

 

            व्याख्यानमालेला सर्वत्र उत्तम प्रतिसाद समाजातून मिळत असून शिवमहोत्सव समितीच्या वतीने पहिल्यांदा यावर्षी दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवाजी महाराज जयंती मोठ्या प्रमाणात ज्या मंडळांनी व शिवप्रेमींनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील गावागावात व चंद्रपूर शहरातील वार्डावार्डात  प्रचंड उत्साहात साजरी केली आणि शिवाजी महाराजांचे खरं कार्य व शिवचरित्र तसेच रयतेचे स्वराज्य निर्माण करून  छत्रपती शिवाजी महाराज यांनी जनतेला हवंहवस वाटणारं सुराज्य कसं निर्माण केलं याची माहिती प्रबोधनाच्या माध्यमातून शिवजयंती आयोजक मंडळांनी व शिवशाहीर, वक्ते यांनी सर्वत्र पोहचवली यासाठी अशा सर्व मंडळांच व शिवशाहीर, वक्ते यांच  कौतुक व्हावे, सर्व शिवप्रेमी कार्यकर्ते यांचा परिचय व्हावा या हेतुने सत्कार कार्यक्रम शिवमहोत्सव समितीच्या वतीने १२ मार्च २०२३ रोजी आक्केवार वाडी तुकूम चंद्रपूर येथील मराठा सेवा संघाच्या सभागृहात घेण्यात आला.

 

       शिवजयंती आयोजक मंडळांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष  शिवमहोत्सव समिती चंद्रपूर चे अध्यक्ष डॉ. चेतन खुटेमाटे साहेब होते. शिवजयंती आयोजक मंडळांनी संपूर्ण जिल्ह्यात गावागावात, शहरातील वार्डात मोठ्या प्रमाणात शिवाजी महाराज जयंती साजरी करून शिवाजी महाराजांचे कार्य सर्वत्र पसरविले आहे असे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ.चेतन खुटेमाटे म्हणाले.

 

      सत्कार कार्यक्रम प्रसंगी शिवमहोत्सव समितीचे निमंत्रक विनोद थेरे यांनी शिवजयंती प्रगत समाज निर्मितीचा पेरणोत्सव या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करताना १९फेब्रुवारी ला शिवजयंतीच अनेक शिवजयंती आयोजक मंडळांनी अप्रतिम आयोजन करुन गडकिल्ले तयार करणे तसेच शिवचरित्रावर भाषण स्पर्धा शिवप्रेमी कार्यकर्ते यांनी घेवून शिवजयंती साजरी केली आणि काही शिवप्रेमी कार्यकर्ते यांनी १९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची तारीख शुभ मुहूर्त समजून लग्नही केले आहे या नाविन्यपूर्ण कार्याचे त्यांनी कौतुक करुन शिवाजी महाराजांचे कार्य शिवजयंतीच्या माध्यमातून अनेक शिवजयंती आयोजक मंडळांनी घराघरात पोहोचविले आहे असे प्रतिपादन केले.

 

     प्रमुख पाहुणे म्हणून मा. इंजि. दिपक खामनकर जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ चंद्रपूर, मा. ऍड. विजय मोगरे अध्यक्ष फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर,

मा. अविनाश जाधव सचिव, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, राजुरा, मा. नितीन पुगलिया, चेअरमन रेनायसन्स इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज चंद्रपूर,

मा. अमित येरगुडे सचिव येरगुडे ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट चंद्रपूर, मा. अंबर जिवतोडे उपाध्यक्ष चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर, मा. सुभाष ठोंबरे अध्यक्ष राजमाता जिजाऊ बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ मोरवा, मा. डॉ. नियाज खान प्राचार्य, रफी अहमद किदवाई सिनिअर कॉलेज चंद्रपूर आदि मान्यवर उपस्थित होते.

 

   अविनाश जाधव यांनी शिवाजी महाराज हे महिलांचा सन्मान करणारे राजे होते असे सांगितले तर अँड. विजय मोगरे यांनी मनोगत व्यक्त करतांना शिवाजी महाराजांचे खरे कार्य घराघरात गेले पाहिजे असे प्रतिपादन केले.

 

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष शंकरराव लोनगाडगे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज हे शिवप्रेमी तरुणांचे प्रेरणा पुरुष असून त्यांचे कार्य तरुणांनी समजून घ्यावे व शिवकालीन सुराज्य परत निर्माण करण्यासाठी हातभार लावावा असे प्रास्ताविक करताना शंकर लोनगाडगे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऍड. शाकीर मलक सदस्य, शिवमहोत्सव समिती चंद्रपूर यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. किरणकुमार मनुरे सदस्य शिवमहोत्सव समिती चंद्रपूर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिवमहोत्सव समितीच्या सदस्यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केले.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...