वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
चंद्रपूर/जिवती:-- कृषी विभागाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील पाणलोट विकास घटक २.० सन २०२२- २०२३ अंतर्गत जिवती तालुक्यात कंप्रोझिट गाॅबियान बंधारा बांधकाम करणे एकूण किंमत ५५ लक्ष ७५ हजार रुपये मंजूर निधीच्या विकासकामांचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये मौजा टेकामांडवा, चिखली (खुर्द), गुडशेला, येल्लापुर आणि लांबोरी या गावालगतच्या नाल्यावर कंप्रोझिट गाॅबियान बंधारा बांधकाम करण्यात येणार आहेत. यात १० मिटर रुंद, १५० मिटर लांब बंधाऱ्यात ३TMC (३० लक्ष लिटर) पाणी साठा असेल. यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना शेती उपयोगी पाणीसाठा तसेच पाळीव प्राण्यांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. या मध्ये टेकामांडवा येथे २, चिखली (खुर्द) येथे ३, गुदशेल्ला येथे ३, येल्लपुर येथे ५ आणि लंबोरी येथे १ असे एकूण १४ गावालगतच्या नाल्यावर हे बंधारे बांधण्यात येणार आहेत. याची एकूण किंमत ५० लक्ष ७५ हजार रुपये असेल तर एका बंधाऱ्याची किंमत ३ लक्ष रुपये पर्यंत असणार आहे.
या प्रसंगी जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब वराटे, उपविभाग कृषी अधिकारी मंगेश पवार, तालुका कृषी अधिकारी पल्लवी गोडबोले, माजी प. स. सभापती सुग्रीव गोतावडे, माजी उपनगराध्यक्ष अशफाक शेख, ताजुद्दीन शेख, सुनील शेडके, वझीर सय्यद, कृषी परिवेक्षक पी. एन. ढाकणे, कर्मयोगी तुकाराम दादा गीताचार्य, टेकामांडवा येथील सरपंच शुभांगी राऊत, उपसरपंच भीमराव कांचकटले, ग्रा. प. सदस्य बोरिकर मॅडम, युवक जिल्हा सचिव बालाजी गोतमवाड, शिवाजी करेवाड, गणपत देवकते, नामदेव नरोटे, रावसाहेब आईटवाड, विश्वनाथ येचेवाड, दत्ता कोंडले, गणापू देवकते, पांडुरंग कांबळे, धमानंद कांबळे, चिखली (खुर्द)चे सरपंच वर्षाताई जाधव, संभाजी ढगे, गुदशेला शाहीर मोरे, येल्लापूर तमुस अध्यक्ष बालाजी कांबळे, माजी सरपंच माधव पेंदोर, संतोष चिकटे, रावसाहेब बनसोडे, सूरज चिकटे, भास्कर सोनकांबळे, दीपक साबणे, प्रशांत कांबळे, पाणलोट सदस्य कर्मराज कांबळे संभाजी ढगे, संतोष हरगीले, बालाजी दूधगोडे, लांबोरी चिनू मडावी, दत्ता गिरी, लक्ष्मण मडावी, कृषी सहाय्यक भारत चौव्हण, माधव राठोड, प्रदीप गेडाम, नामदेव राठोड यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...