रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते उत्कृष्ट आशास्वयंसेविकांचा सत्कार.
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
चंद्रपूर/कोरपना :- राष्ट्रीय आरोग्य अभियााअंतर्गत जिल्हा परिषद चंद्रपूर तालुका कोरपना आणि जिवती यांच्या वतीने बालाजी सभागृह, गडचांदूर येथे जागतिक महिला दिन व आशा दिनानिमित्त स्नेहमिलन, सांस्कृतिक महोत्सव व तालुक्यातील ग्रामीण स्तरावरील आशास्वयंसेविका व गटप्रवर्तकांसाठी विविध स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. तसेच तालुका स्तरिय उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना आ. सुभाष धोटेंच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की, कोरोना काळात ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका अतिशय पोटतिडकीने व जबाबदारीने काम करीत होत्या. संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी, बिगर आदिवासी क्षेत्रात, ग्रामीण, शहरी भागात दैनंदिन जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका आशास्वयंसेविका पार पाडतात. शासकीय योजनांचे लाभ गरजू लाभार्थीच्या घराघरापर्यंत पोहोचवतात. बर्याच दिवसांपासून यांचे आंदोलन सुरू होते. आम्ही पाठिंबा देऊन स्वतः सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊन मागण्या मान्य कराव्यात यासाठी प्रयत्न केलेत. राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनात त्याची दखल घेऊन काही प्रमाणात वेतनात वाढ करण्यात आली आहे. या पुढेही आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू.
या प्रसंगी नगराध्यक्षा सविता टेकाम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे, वैद्यकिय अधिकारी डॉ. संजय घाटे, महिला व बालविकास अधिकारी गणेश जाधव, डॉ. बावणे, डॉ. कुरेशी, डॉ. शर्मा, डॉ. करोने, डॉ. काकळे, डॉ. ताकसांडे, डॉ. शेख, जिवती व कोरपना तालुक्यातील आशास्वयंसेविका व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. कार्यक्रमाचे संचालन प्रेमचंद वाकडे यांनी तर आभार प्रदर्शन ए. एन. निंबाळकर यांनी केले.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...