वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस :- शहरातील रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असून शहरातून जाणाऱ्या जड वाहनांमुळे रेल्वेगेट परिसरात राजीव रतन चौकात शहरात वाहतूक समस्या निर्माण होत आहे.
या वाहतूक समस्येबाबत दि. 17 ऑगस्ट 2022 रोजी प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी पाहणी अहवाल सादर केला आहे. मुंबई पोलीस अधिनियम 1951च्या कलम 33(1)(ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर रहदारीचे करावयाच्या नियमनासाठी घुग्गुस शहरातून जाणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे वाहतूक समस्या निर्माण होऊन रहदारीला अडथळा निर्माण होऊ नये तसेच जनतेला त्रास होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये व अपघातासारखे अनुचित प्रकार घडून जिवित किंवा वित्तहानी होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या संदर्भात नव्याने उपाययोजना करण्याचे आवश्यक झाले आहे.
याकरीता 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस बंद करण्याची परवानगी देण्यात आली होती. सदर कालावधीत अद्यापही रेल्वे ब्रीजचे बांधकाम पुर्ण न झाल्याने महाराष्ट्र रेल इन्फास्ट्रक्चर डेवलपमेंट कॉर्पोरेशन लिमीटेड कंपनीचे पत्र प्राप्त झाले आहे. त्याअनुषंगाने दि. 31ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यामुळे दि. 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस बंद करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने घुग्घुस बसस्थानक ते म्हातारदेवीपर्यंत जड वाहतुकीस बंद राहील. घुग्घुस बसस्थानक ते राजीव रतन हॉस्पिटल-बेलोरा ओवर ब्रिज मार्गे वणीकडे जाणारा रस्ता जड वाहतुकीस बंद राहील.
अन्य पर्यायी मार्गाचा वापर करा
पर्यायी मार्ग म्हणून वणीकडून घुग्घुसकडे येणारी जड वाहतूक राजीव रतन हॉस्पिटलपर्यंत येऊ शकेल. वणीकडून, घुग्घुस बसस्थानकाकडे जाण्यासाठी पाटाळा-कोंडा फाटा किंवा पाटाळा-वरोरा-भद्रावती-ताडाळी-पडोली घुग्घुस मार्गाचा अवलंब करावा. घुग्घुसकडून वणी जाण्याकरीता पडोली-भद्रावती-वरोरा मार्गाचा अवलंब करावा. असे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी कळविले आहे.
या जदवाहतुकीचा फायदा घेवून शहरातील अनेक भाई लोग वसुली करतात नवनियुक्त ठाणेदार आसिफ राजा यांनी भाई लोकांना चांगलाच दम दिल्याचे नागरिकांत चर्चा आहे
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...