Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / असाही एक वाढदिवस - सरपंच...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

असाही एक वाढदिवस - सरपंच नंदकिशोर वाढई यांनी चक्क स्मशानभूमीत श्रमदान करून साजरा केला वाढदिवस.

असाही एक वाढदिवस - सरपंच नंदकिशोर वाढई यांनी चक्क स्मशानभूमीत    श्रमदान करून साजरा केला वाढदिवस.

असाही एक वाढदिवस - सरपंच नंदकिशोर वाढई यांनी चक्क स्मशानभूमीत

 

श्रमदान करून साजरा केला वाढदिवस.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

चंद्रपूर/राजुरा :- राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांनी आपला वाढदिवस चक्क स्मशानभूमीत श्रमदान करून साजरा केला. नंदकिशोर वाढई हे उपक्रमशील, सुधारणावादी विचार आणि कृती अमलात आणणारे असल्याने त्यांनी आपला वाढदिवस हा गावातील स्मशानभूमीत श्रमदान करून साजरा केला. कळमना येथील ऑक्सिजन पार्कमध्ये श्रमदान केले. मानवी जीवनासाठी ऑक्सिजन हा महत्त्वपूर्ण घटक आहे. करोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व काय हे लोकांना समजले आहे. त्यामुळेच  सरपंच वाढई यांनी दूरदृष्टी ठेवून कळमना येथे ऑक्सिजन पार्क उभारण्याचा निर्णय घेतला. तिथे लावलेल्या फुल, फळझाडांच्या देखभालीचे उत्तम नियोजन केले असून वाढदिवसानिमित्त कुठेही बडेजाव न करता अन्य कार्यक्रमाला बगल देत ऑक्सिजन पार्क मध्ये श्रमदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या उपक्रमाबाबत अनेकांकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

      या प्रसंगी कळमनाचे सरपंच, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस तथा ओबीसी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांचा स्मशानभूमी येथे कृष्णाजी भोयर भोई समाजाचे नेते तथा विभागीय सरचिटणीस नागपूर यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. सरपंच वाढई यांनी सत्कार प्रसंगी बोलताना सांगितले की, गावातील स्मशानभूमीत श्रमदान करून ऑक्सिजन पार्क मधील वनराई सोबत वाढदिवस साजरा करण्यात मला आनंद आहे. सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते कृष्णाजी भोयर येथे येऊन शाल व श्रीफळ देऊन माझा सत्कार केला हा अविस्मरणीय अनुभव आहे. गाव, परिसरातील लोकांसाठी सदैव सेवा कार्य करेल अशा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

    या प्रसंगी पोलिस पाटील बाळकृष्ण पिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, माजी तंटामुक्ती अध्यक्ष महादेव ताजने, ग्रा. प. सदस्य दिपक झाडे, धोपटाळा माजी सरपंच राजुभाऊ पिपळशेंडे, उपसरपंच कौशल्य कावळे, ग्रा. प. सदस्य सुनिता उमाटे, रंजना पिंगे, मुख्याधापक धानकुटे सर, पेदोर सर, ग्रामसेवक नारनवरे, गोखरे मॅडम, दुधे मॅडम, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष पुंडलिक पिंगे, महादेव आंबिलकर, संगीता उमाटे, मिना भोयर, कल्पना क्षिरसागर, भंजन मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल वाढई, देवराव ताजने, पुरुषोत्तम आत्राम, देवानंद आंबिलकर, दत्तू कुकडे, संदीप गिरसावळे, मनोहर कावळे, मारुती वाढई, सुभाष वाढई, गंगाधर पेंदोर, भाऊराव चापले, महादेव उमाटे, शंकर ताजने ज्ञानेश्वर बोढे, राजेश गिरसावळे, जि प उच्च प्राथ शाळेचे विद्यार्थी, शिपाई सुनील मेश्राम, विशाल नागोसे, समस्त नागरिक व मित्रपरिवार उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...