वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटेंच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन.
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
????7498975136
चंद्रपूर/राजुरा:-- जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक वर्षापासुन शासनाकडून शालेय गणवेश पुरविण्यात येतात मात्र यात काही समाजातील विद्यार्थांना गणवेश खरेदी करण्यासाठी आर्थिक तरतुद उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी व पालक वर्गांमध्ये निराशा व असंतोष आहे. जिल्ह्य़ातील काही शाळेत शिक्षक, मुख्याध्यापक व पालक यांच्या सहकार्याने अशा विद्यार्थांना गणवेश वाटप करण्यात येतात तर काही शाळेत पालक स्वतः खरेदी करतात, काही शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मिळत नाही. शाळेतील गणवेशाची ही समस्या सोडविण्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांना शालेय गणवेश खरेदी करण्यासाठी आर्थिक तरतुद उपलब्ध करून देण्यात यावी व सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळावेत यासाठी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस तर्फे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले असून जिल्हय़ातील सर्व जाती च्या विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेश वाटप करण्यात यावे यासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक वर्षापासुन शालेय गणवेश शासनाकडून पुरविण्यात येतात. गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आलेले आहे. शासनस्तरावरून गणवेशासाठी निधी जिल्हा परिषदेला वितरीत करण्यात येतो. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियान विभागाकडून तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे हा निधी वितरीत करण्यात येतो. तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर हा निधी वितरीत करण्यात येतो. शासनाकडून देण्यात येणारा हा निधी शाळेत प्रवेशीत असलेल्या सर्व मुली व अनुसूचित जाती, जमाती, दारिद्र्य रेषेखालील मुले यांच्यासाठी देण्यात येतो. मात्र इतर समाजातील विद्यार्थांना गणवेश खरेदी करण्यासाठी आर्थिक तरतुद उपलब्ध होत नसल्याने शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती ला गणवेश विद्यार्थ्यांना वाटप करतांना अडचणी येतात. ज्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाहीत त्या विद्यार्थ्यांना शाळेत आपल्या जातीची जाणिव होते. लहान वयात जातीचे बीज मुलांच्यामध्ये पेरले जाते. शाळेतील काही मुलांना शालेय गणवेश मिळतो तर काहिना मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये व पालकामध्ये नाराजी निर्माण होते आहे. शिक्षक व मुख्याध्यापक यांना गणवेश का मिळत नाहीत म्हणुन पालकांना उत्तरे देऊन रोषाला सामोरे जावे लागते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश सारखा मिळत नसल्याने शाळेत विद्यार्थ्यांमध्ये विविधता दिसते, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये न्युनंगड निर्माण होऊन जातीचे बीज शाळेतच पेरल्या जाते. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होतो. तेव्हा ही गंभीर बाब लक्षात घेऊन यावर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रसंगी चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस चे महासचिव प्रणय लांडे, राजुरा तालुका अध्यक्ष इर्शाद शेख, लोक नियुक्त युवा सरपंच रोशन मरापे, चिमूर विधान सभा अध्यक्ष रोशन धोक, सागर करमंकर, प्रतीक वनकर यासह युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...