Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / आदिवासी बांधवांची खावटी...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

आदिवासी बांधवांची खावटी मदत १० हजार रुपये करावी : खावटी कर्जाचे वाटप वेळेवर व्हावे. आमदार सुभाष धोटेंनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली मागणी.

आदिवासी बांधवांची खावटी मदत १० हजार रुपये करावी : खावटी कर्जाचे वाटप वेळेवर व्हावे.    आमदार सुभाष धोटेंनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली मागणी.

आदिवासी बांधवांची खावटी मदत १० हजार रुपये करावी : खावटी कर्जाचे वाटप वेळेवर व्हावे.

 

आमदार सुभाष धोटेंनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली मागणी.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

चंद्रपूर /राजुरा:- महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी आदिवासी बांधवांना शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या खावटी मदत आणि कर्ज वाटप यावर प्रश्न उपस्थित करून राज्यातील आदिवासी बांधवांना शासनाकडून दिली जाणारी  ४ हजार रुपये खावटी मदत वाढवून ती १० हजार रुपये करावी. तसेच राजुरा विधानसभा क्षेत्रात आणि महाराष्ट्राच्या अतिदुर्गम भागातील अनेक आदिवासी बांधवांकडे बँकेचे अकाऊंट नसते तेव्हा त्या लाभार्थीना त्यांच्या घरापर्यंत जाऊन ही मदत पोहचविण्यासाठी शासनाने उपक्रम सुरू करावे. तसेच खावटी कर्जाचे वाटप वेळेवर करावे अशी मागणी केली. आ. सुभाष धोटे हे अतिदुर्गम, आदिवासी बहुल भाग असलेल्या राजुरा विधानसभा मतदारसंघातील तसेच राज्यातील आदिवासी, अनुसूचित जाती, जमातींच्या समस्या वारंवार विधिमंडळात उपस्थित करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत असतात हे विशेष.

         महाराष्ट्र राज्याच्या अतिदुर्गम, आदिवासी बहुल भागात राहणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या आदिवासी बांधवांचे वार्षिक नियोजन हे शासनाच्या खावटी कर्जावर आणि मदतीवर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते परंतू सन २०२२ मध्ये खावटी कर्ज वाटप न केल्यामुळे राज्यातील आदिवासी बांधवांची घोर निराशा झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. ४ हजार रुपयाप्रमाणे ११ लाख ५० हजार आदिवासी कुटूंबाला एकूण ४४० कोटी रुपयाचे खावटी कर्ज वितरीत करण्याचा शासनाला विसर पडल्याने दऱ्या-खोऱ्यांत आणि दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना पुरक पोषण आहार न मिळाल्याने कुपोषनाचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. आदिवासी विकास विभागाच्या गाफील नियोजनामुळे शासनाचे ४४० कोटी रुपये अखर्चित राहील्याची गंभीर बाब समोर आली आहे. अद्यापपर्यंत आदिवासी विकास विभागाकडून नव्याने खावटी कर्ज वितरीत करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला का, या गंभीर बाबी कडे शासनाचे झालेले अक्षम्य दुर्लक्ष, याबाबत शासनाने तातडीने कार्यवाही व उपाययोजना करून राज्यातील आदिवासी बांधवांना तातडीने खावटी कर्ज वाटप करावे व ४ हजार रुपये दिली जाणारी शासकीय मदत वाढवून ती १० हजार रुपये करावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून केली आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...