वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
जागतिक महिला दिनानिमित्त पं. स. राजुरा च्या वतीने विविध वैयक्तीक लाभार्थीना साहित्यांचे वितरण.
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
7498975136
चंद्रपूर/राजुरा:-- पंचायत समिती राजुरा च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना २०% सेस फंड समाज कल्याण विभाग अंतर्गत शिलाई मशीन, आटा चक्की उभारण्यासाठी धनादेश, ५% दिव्यांग वैयक्तिक लाभ योजने अंतर्गत झेरॉक्स मशीन खरेदीसाठी धनादेश, मानव विकास मिशन अंतर्गत जि प शाळेच्या मुलींना मोफत सायकल अशा विविध वैयक्तीक लाभार्थीना विविध उपक्रमांतर्गत साहित्यांचे वितरण करण्यात आले. तर पं. स. राजुरा अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. आणि किशोरवयीन मुली, महिला जेंडर, आरोग्य, कुटुंबनियोजन, कायदेविषयक प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रसंगी आपल्या उद्घाटनपर मार्गदर्शनात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, जगाला सुंदर करण्यात कर्तुत्वान महिला शक्तींचे अनमोल योगदान आहे. खऱ्या अर्थाने महिलांमुळेच घराला घरपण येते. अनेक आव्हानांना सामोरे जात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. येणाऱ्या काळात आपले हे सामर्थ्य ओळखून आनखी प्रगती करण्यासाठी महिलांनी शिक्षण, तंत्रज्ञान, व्यावसायिक कौशल्य, स्पर्धा परीक्षा आणि सर्वांगीण विकासाची कास धरावी असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी काँग्रेसचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उद्घाटक आमदार सुभाष धोटे, प्रमुख अतिथी गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, माजी सभापती कुंदा जेणेकर, मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव, गटशिक्षणाधिकारी दिलीप गौरकार, सहाय्यक गटविकास अधिकारी धर्मपाल कराडे, प्रकल्प अधिकारी अमित मेश्राम, विस्तार अधिकारी आनंद नेवारे, रवी रत्नपारखी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गटसाधन व्यक्ती मुसा शेख, करूणा गावंडे यांनी केले प्रास्ताविक गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकल्प अधिकारी अमित मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने महिला उपस्थित होत्या.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...